शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचे काम अद्यापही पूर्णपणे मराठीत नसल्याची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:43 IST

नंदुरबार : न्यायलयीन कामकाज अद्यापही पूर्णपणे मराठीतून सुरू होऊ शकले नसल्याची खंत मराठी भाषाप्रेमींनी व्यक्त केली. याबाबतचा अध्यादेश दोन ...

नंदुरबार : न्यायलयीन कामकाज अद्यापही पूर्णपणे मराठीतून सुरू होऊ शकले नसल्याची खंत मराठी भाषाप्रेमींनी व्यक्त केली. याबाबतचा अध्यादेश दोन दशकांपूर्वी काढण्यात आलेला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे निकालही मराठी भाषेतून मिळू लागल्याने त्यातल्या त्यात ही समाधानाची बाब म्हणाावी लागेल.

न्यायालयाचे बहुतांश कामकाज पूर्वी इंग्रजीत चालत होते. निवाडेही इंग्रजीतूनच दिले जात होते. त्यामुळे सामान्य पक्षकारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेता दोन दशकांपूर्वी न्यायालयांचे कामकाज मराठीतून व्हावे यासाठी अध्यादेश काढण्यात आला होता. सुरुवातीलाच त्याची अंमलबजावणी फारच कमी होती. नंतर मात्र ती वाढली. आता देखील बऱ्यापैकी त्याची अंमलबजावणी सुरू आहे. असे असले तरी काही बाबींमध्ये इंग्रजीचा अंतर्भाव असतोच. त्यामुळे पक्षकारांना काही प्रमाणात अडचणी येतात. त्यात आणखी सुधारणा व्हावी व गती यावी, अशी अपेक्षा मराठी भाषाप्रेमींनी व्यक्त केली आहे.

दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकालदेखील मराठीतून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे अंतिम निवाड्यांमध्ये ग्राह्य धरले जातात. सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे त्या त्या मातृभाषेतून वाचायला मिळावे यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आग्रही होते. त्यांनी २०१७ मध्येच सर्वोच्च न्यायालयाला याबाबत सुचविले होते. त्यामुळे आता कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ते सोयीचे तर ठरतच आहे, शिवाय निकालांमधील अनेक बाबी समजण्यास आणि शिकण्यास देखील मिळू लागल्या आहेत.

आता न्यायालयांमधील कामकाज पूर्णपणे मराठीतून झाले तर त्यात आणखी भर पडणार आहे, अशी अपेक्षा अनेक विधीतज्ज्ञांनी आणि मराठी भाषा प्रेमींनीदेखील व्यक्त केली आहे.

कोट....

मराठीतून न्याय निवाडा व्हावा यासाठी उच्च न्यायालयाने सूचना केल्या आहेत. बहुतांशी त्याचे पालनही होत आहे. लॅाकडाऊनच्या कालावधीत त्यात काही प्रमाणात खंड पडला होता. सद्याही युक्तिवाद व इतर बाबी या मराठीतूनच होत आहेत. इतर कामकाजात देखील मराठीची भर पडावी अशी अपेक्षा आहे. -ॲड.राजेश कुलकर्णी, विधीतज्ज्ञ, शहादा.