लायन्स क्लबमार्फत नंदुरबार येथे विभागीय तेजोमय कॉन्फरन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:59 PM2020-01-14T12:59:57+5:302020-01-14T13:00:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लायन्स क्लबच्या ३२३४ डिस्ट्रीक्टची विभागीय तेजोमय कॉन्फरन्स येथे झाली. लायन्सच्या ३२३४ रिजनच्या प्रमुख डॉ.तेजल ...

Regional Bright Conference at Nandurbar through Lions Club | लायन्स क्लबमार्फत नंदुरबार येथे विभागीय तेजोमय कॉन्फरन्स

लायन्स क्लबमार्फत नंदुरबार येथे विभागीय तेजोमय कॉन्फरन्स

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लायन्स क्लबच्या ३२३४ डिस्ट्रीक्टची विभागीय तेजोमय कॉन्फरन्स येथे झाली.
लायन्सच्या ३२३४ रिजनच्या प्रमुख डॉ.तेजल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कॉन्फरन्स झाली. या वेळी लायन्सचे इंटरनॅशनल डायरेक्टर डॉ.नवल मालू, प्रांतपाल नितीन बंग, उपप्रांतपाल दिलीप मोदी, गीता उपासनी, सुप्रिया कोतवाल, चेतन बर्डीया आदी उपस्थित होते. या वेळी नंदुरबार, धुळे, जळगाव या तीन जिल्ह्यातील सर्व लायन्स क्लब सहभागी झाले होते. त्यात तिन्ही जिल्ह्यांचा आढावा घेणारे बुलेटीन प्रकाशित करण्यात आले.
या वेळी रिजन चेअरपर्सन डॉ.तेजल चौधरी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांना इंटरनॅशनल सर्टीफिकेट देऊन सन्मानीत करण्यात आले. कॉन्फरन्ससाठी नंदुरबारचे लायन्स क्लबचे अध्यक्ष समीर शहा, सचिव सतीश चौधरी, कोषाध्यक्ष नितीन जैन, फेमिना क्लबच्या अध्यक्षा चेतना शाह, सचिव शीतल चौधरी, गायत्री पाटील आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ.तेजल चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन सीमा मोडक तर आभार राजेंद्र माहेश्वरी यांनी मानले.

Web Title: Regional Bright Conference at Nandurbar through Lions Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.