शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयांवर ७० स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा तालुक्यातील धरणांच्या जलाशयांवर येणाऱ्या परदेशी पक्ष्यांची नोंदणी करण्यात शहादा येथील वन्यजीव संस्थेला यश ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा तालुक्यातील धरणांच्या जलाशयांवर येणाऱ्या परदेशी पक्ष्यांची नोंदणी करण्यात शहादा येथील वन्यजीव संस्थेला यश आले आहे़ संस्थेने तब्बल ७० पक्ष्यांची नोंद केली असून हे पक्षी दरवर्षी येथे स्थलांतर करत असल्याने त्यांचा अभ्यास करणे यामुळे सोयीस्कर होणार आहे़वन्यजीव संस्थेने राबवलेल्या या उपक्रमास शहादा वनविभागाचे सहकार्य मिळाले़ संस्थेने जैवविविधता नोंदणींतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला होता़ नोंद करण्यात आलेल्या पक्ष्यांच्या छायाचित्रांसह माहीती पुस्तिका तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ संस्थेचे पक्षी अभ्यासक तब्बल १५ दिवस तालुक्यातील दरा धरण, राणीपूर धरण, गोमाई धरण, डोंगरगाव तलाव आणि दुधखेडा धरण याठिकाणी थांबून होते़ यात त्यांनी दर्वीमुख, रंगीत बगळा, वैष्णव बदक, गडवाल बदक, ब्राह्मणी बदक, भुवई बदक या स्थलांतरीत पक्ष्यांचा देखील समावेश आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेचे सागर निकुंभे, अमोल जमादार, भीमसेन रावताळे यांनी या पक्ष्यांच्या नोंदी केल्या तर छायाचित्रकार युवराज मराठे यांनी छायाचित्रे घेतली आहेत़

जिल्ह्यातील विविध भागातील पाणथळ जागा, धरणे आणि जलाशयांवर नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात उत्तर भारतातून परदेशी पक्षी बिनीच्या हंगामासाठी स्थलांतर करतात़ या पक्ष्यांच्या नोंदी घेण्याचे काम वनविभाग त्या-त्या भागात करत आहे़ वन्यजीव संस्थेने जिल्ह्यात हे काम सुरु केल्याने दुर्मिळ अशा पक्ष्यांच्या नोंदी होऊन त्यांच्यावर अभ्यास करणे सोपे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़