शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

वंजारी सेवा संघातर्फे सत्कार समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

अध्यक्षस्थानी भटके-विमुक्त हक्क परिषदेचे प्रदेश संघटक सुपडू खेडकर, तर प्रमुख अतिथी म्हणून पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर साबळे, वेतनपथक अधीक्षक ...

अध्यक्षस्थानी भटके-विमुक्त हक्क परिषदेचे प्रदेश संघटक सुपडू खेडकर, तर प्रमुख अतिथी म्हणून पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर साबळे, वेतनपथक अधीक्षक मीनाक्षी गिरी, तालुका कृषी अधिकारी अनिल कागणे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पुरुषोत्तम काळे व त्यांचे लहान भाऊ प्रा. डॉ. विठ्ठल काळे यांनी नुकतीच पीएच. डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला. भटके विमुक्त प्रवर्गातील ५३ जाती-जमातींचे संघटन उभारून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी चळवळीच्या माध्यमातून मेळावे, आंदोलने व निवेदने देऊन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडून भटके विमुक्तांच्या चळवळीला आलेली मरगळ झटकून नवसंजीवनी देण्याचे कार्य पुरुषोत्तम काळे यांनी केले आहे. भटके विमुक्तांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची अपेक्षा खेडकर यांनी व्यक्त केली. मीनाक्षी गिरी, भटके विमुक्त हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण मोरे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवी गोसावी, शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष मधुकर नागरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

शिक्षक व सामाजिक चळवळीत काम करताना मिळालेली प्रत्येक जबाबदारीला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत मिळालेली जबाबदारी ही सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे, हे समजून वंचित, उपेक्षित समाजाचे प्रश्न शासनदरबारी मांडून त्यांना वाचा फोडण्याचे कार्य सातत्याने चिकाटीने केल्याने राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाल्याचे पुरुषोत्तम काळे यांनी सांगितले. प्रास्ताविक राकेश आव्हाड यांनी केले. सूत्रसंचालन रामकृष्ण बागल यांनी, तर आभार शरद घुगे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन आबा बच्छाव, नितेंद्र चौधरी, किरण घरटे, चेतना चावडा, मधुकर नागरे, मनोज चौधरी, अनिल देवरे, प्रदीप पाटील, संदीप काकुस्ते, गणेश अचिंतलवार, संदीप खेडकर, रवींद्र भाबड, भाऊसाहेब वंजारी, बाबा आव्हाड आदींनी केले.