शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात ‘सीवायडीए’मार्फत १५ बेड प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST

कोठार : सामाजिक बांधिलकी जपत पुणे येथील सीवायडीए संस्थेमार्फत तळोदा उपजिल्हा रुग्णालयात १५ बेड प्राप्त झाले आहेत. यामुळे कोरोना ...

कोठार : सामाजिक बांधिलकी जपत पुणे येथील सीवायडीए संस्थेमार्फत तळोदा उपजिल्हा रुग्णालयात १५ बेड प्राप्त झाले आहेत. यामुळे कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध होणार असून उपचार करणे सोयीचे ठरणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असली तरी प्रशासनाकडील अपुऱ्या सोयी सुविधेमुळे अनेक ठिकाणी रुग्णांना उपचारासाठी बेड्स वेळेत उपलब्ध होत नाहीत. बेड उपलब्ध न होणे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा अभाव आदींमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशा संकटांच्या प्रसंगी सामाजिक जबाबदारी म्हणून विविध संघटना पुढाकार घेत आहेत. कोरोना रुग्णांना काही प्रमाणात आधार मिळेल आणि शासकीय यंत्रणांवरील ताणही कमी होईल या भावनेतून नंदुरबार सेंट्रल युथ डेव्हलपमेंट ॲण्ड ॲक्टिव्हिटीज या पुणे येथील संस्थेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील विविध भागातील कोविड केअर सेंटरमध्ये या संस्थेच्या माध्यमातून बेड उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात पुणे येथील सेंट्रल युथ डेव्हलपमेंट ॲण्ड ॲक्टिव्हिटीज या संस्थेमार्फत तळोदा उपजिल्हा रुग्णालयाला १५ बेड्स मंगळवारी उपलब्ध झाले आहेत. तहसीलदार गिरीश वखारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, डॉ. भरत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय पाटील व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे बेड्स आरोग्य विभागाकडे सुपुर्द करण्यात आले.