शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशन मालाला पायबंद घालावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

कोरोनामुळे राज्य सरकारने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात मात्र स्थानिक प्रशासनाने वाढती रुग्णसंख्या पाहता, १ एप्रिलपासून संचारबंदी ...

कोरोनामुळे राज्य सरकारने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात मात्र स्थानिक प्रशासनाने वाढती रुग्णसंख्या पाहता, १ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. अर्थात सध्या रुग्णसंख्या कमी झाली आहे. संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून, अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता पाहता, राज्य शासनाने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना एक महिन्याचे धान्य मोफत पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांना आधार मिळाला. शासनाकडून मिळालेले धान्य सर्वसामान्य लाभार्थ्यांना ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार मिळाले का? हेही तपासणे गरजेचे आहे. कारण शासनामार्फत पुरविण्यात आलेला धान्यादी माल हा लाभार्थी संख्येनुसार वितरित केला जातो. तो लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता थेट बाजारात विक्री कसा होतो? हाही चिंतनाचा विषय आहे. संचारबंदीच्या काळात भूकबळी होऊ नये, यासाठी राज्य शासनाचा निर्णय स्तुत्य असला, तरी काहींसाठी हे कमाईचे साधन झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून काळ्या बाजारात रेशन मालाची परस्पर विक्री करणाऱ्यांना लगाम लावणे गरजेचे आहे.

दक्षता समिती नावालाच

स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होणारा माल लाभार्थींपर्यंत पोहोचतो का, त्यात येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी गावोगावी गावपातळीवर दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे; परंतु, या समितीची बैठक कागदोपत्रीच होत असल्याचे म्हटले जात आहे. निदान समितीतील सदस्यांनी रेशन दुकानातील धान्याच्या मालाची तस्करी रोखण्यासाठी गावपातळीवर पुढाकार घेणे गरजेचे आहे.

महसूल विभागाने कारवाई केली का?

गेल्या आठवड्यात तालुक्यातील एका गावावरून स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणारा तांदूळ एकत्र वाहनात भरून वाहतूक केली जात होती. पोलिसांनी तपासणी केली असता व माहिती घेतली असता, तो काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता, काळ्या बाजारात तांदूळ विक्रीसाठी नेणाऱ्या आरोपींनी चक्क पोलिसांना मारहाण करून एकाचा हातच जखमी केला आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाने अशांना जरब बसविणे गरजेचे आहे. स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होणारा तांदूळ परस्पर काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती महसूल प्रशासनाला का? नाही? घडलेल्या घटनेबाबत शहादा पुरवठा विभागाने माहिती घेऊन त्या दुकानदाराविरुद्ध कारवाई केली का? केली नसेल तर का? नाही? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे गोरगरीब जनतेच्या हाताला काम नाही, मजुरी नाही, खायला अन्नधान्य नाही? अशा परिस्थितीत स्वस्त धान्य दुकानातून परस्पर काळ्या बाजारात तांदूळ विक्री करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई होईल का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.