देवी दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:40 IST2020-03-08T21:40:13+5:302020-03-08T21:40:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देवीचे दर्शन घेण्यासाठी चुलत भावासोबत जात असलेल्या महिलेला धमकवून चौघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ...

Rape woman raped | देवी दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेवर बलात्कार

देवी दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेवर बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : देवीचे दर्शन घेण्यासाठी चुलत भावासोबत जात असलेल्या महिलेला धमकवून चौघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना खेडदिगर, ता.शहादा येथे ६ रोजी घडली. याबाबत चौघांविरुद्ध म्हसावद पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित कोळी, बादल मेहतर, आकाश मेहतर, आसिफ ईस्माईल कुरेशी सर्व रा.खेतिया, पानसेमल असे संशयीतांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, खेतिया येथील महिला आपल्या चुलत भावासोबत कोचरा येथे देवीच्या दर्शनासाठी पायी जात होती. सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास महिला व तिचा चूलत भाऊ खेडदिगर शिवारातील पायवाटेने जात असतांना रोहीत कोळीसह चारजण त्यांच्याजवळ आले. शेतात एकटे काय करीत आहे म्हणून धमकवले. परंतु महिला आणि सोबत असलेल्या युवकाने आम्ही भाऊ-बहिण असून देवीच्या दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले. तरीही चौघांनी ऐकुण घेतले नाही. त्यांना धमकवून मारहाण केली. रस्त्याने जाणाºया काही जणांनी त्यांना समजवले. भितीने महिलेचा चुलत भाऊ तेथून पसार झाला. त्यानंतर चौघांनी महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यांच्या तावडीतून सुटून महिलेने गाव गाठले आणि आपबिती सांगितली. नंतर म्हसावद पोलीस ठाण्यात जावून चौघांविरुद्ध फिर्याद दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक किरण पवार करीत आहे.

Web Title: Rape woman raped