शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रंगावली प्रकल्प ओसंडून वाहू लागल्याने नवापुरचा पाणी प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : तालुक्यात संततधार पावसाचा जोर कायम असून लघु व मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरले आहेत़ सर्वाधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : तालुक्यात संततधार पावसाचा जोर कायम असून लघु व मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरले आहेत़ सर्वाधिक मोठय़ा रंगावली प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागल्याने तालुक्यात आनंद व्यक्त होत होता़ तालुक्यात आतार्पयत सरासरी 55 टक्के पाऊस झाला आह़ेतालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान एक हजार 100 मिलीमीटर आहे. तालुक्यात जून व जुलैचे पहिले दोन आठवडे जवळपास कोरडे गेले. पिण्याच्या पाण्याची कधी नव्हे एवढी भिषण स्थिती ग्रामीण व शहरी भागात अनुभवास आली. जुलैच्या तिस:या आठवडय़ात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी तर दुसरीकडे गारवा निर्माण झाल्याने उकाडय़ामुळे त्रस्त झालेले नागरिकही सुखावले. पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याने चिंता दूर होउन बळीराजाही आनंदीत झाला. गत  आठवडय़ात या हंगामाचा सर्वात चांगला पाऊस झाला. गेल्या दहा दिवसात 380 मिलीमीटर पाऊस झाला. आज अखेर 657 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या 55 टक्के पाऊस झाल्याने सर्वत्र उत्साह आहे. जिल्ह्यातील सर्वात जुना रंगावली मध्यम प्रकल्प गत 10 दिवसात झालेल्या पावसामुळे क्षमतेएवढा भरल्याने शुक्रवारी सकाळी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी वाहुन निघाले. नवापूर शहराचा पाणी पुरवठा रंगावलीच्या पाणी साठ्यावर अवलंबून आहे. दरवर्षी जुलैच्या दुस:याच आठवड्यात भरुन निघणारा हा प्रकल्प ऑगस्ट उजाडल्यावर भरल्याने शहरवासीयांच्या चिंताही कमी झाल्या आहेत. विसरवाडी जवळील नागन व खांडबारा भागातील कोरडी मध्यम प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहे. यासह रायंगण, मुगधन, सुळी यासारखे तालुक्यातील 32 लघु प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला आहे.दरम्यान संततधार पावसामुळे धायटे भागातील बिलबारा गावातील एक घर कोसळले. सुदैवाने घरातील दोन्ही चिमुकल्यांसह महिला बालंबाल बचावले.