मांडवी बुद्रूक येथील राजवाडी होळी उत्सव यंदा साध्या पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:11+5:302021-03-27T04:31:11+5:30

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, कारभारी, युवक ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान बैठकीत कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ...

Rajwadi Holi festival at Mandvi Budruk in a simple manner this year | मांडवी बुद्रूक येथील राजवाडी होळी उत्सव यंदा साध्या पद्धतीने

मांडवी बुद्रूक येथील राजवाडी होळी उत्सव यंदा साध्या पद्धतीने

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, कारभारी, युवक ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान बैठकीत कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मांडवी बुद्रूक गावातील होळी पूजा गर्दी न करता साध्या पद्धतीने करावी असा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहे.

धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रूक येथील राजवाडी होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदा कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन करून यंदाची होळी आदिवासी रितीरिवाज व परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. तरी २८ मार्च २०२१ रोजी रात्री होळी आहे. या होली उत्सव निमित्ताने बाहेर गावातील बावा बुद्या, ढोल वाजक, तसेच बाहेर गावातील नागरिक, व्यापारी वर्गाने येऊ नये. यावर्षी यात्रा भरणार नाही, असे आवाहन मांडवी बुद्रूक येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Rajwadi Holi festival at Mandvi Budruk in a simple manner this year