आठवडय़ात दुस:यांदा नवापूरला अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:09 IST2019-07-26T12:09:37+5:302019-07-26T12:09:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आठवडाभरात दुस:यांदा नवापूर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. असे असले तरी अद्यापही जिल्ह्यात ...

Rainfall in Navapur for the second time in a week | आठवडय़ात दुस:यांदा नवापूरला अतिवृष्टी

आठवडय़ात दुस:यांदा नवापूरला अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आठवडाभरात दुस:यांदा नवापूर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. असे असले तरी अद्यापही जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद नवापूर तालुक्यातच कायम आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर जिल्हाभरात पावसाची रिपरिप कायम होती. 
जिल्ह्यात पावसाची 42 टक्के तूट कायम असतांना बुधवारी रात्रीपासून पावसाने रिपरिप सुरू केली आहे. गुरुवारी देखील दिवसभर पाऊस सुरू होता. सायंकाळी नंदुरबारसह काही भागात पावसाचा जोर कायम होता. 
नवापूर तालुक्यात गेल्या शनिवारी 70 मि.मी.पावसाची नोंद झाली होती. गुरुवारी पहाटे देखील मुसळधार पाऊस झाल्याने नवापूर तालुक्यात पुन्हा 75 मि.मी.पाऊस नोंदला गेला. अर्थात आठवडाभरातच नवापूर तालुक्यात दुस:यांदा अतिवृष्टी नोंदली गेली. असे असले तरी सरासरीच्या दृष्टीने नवापूर तालुक्यात जिल्ह्यात सर्वात कमी पजर्न्यमान नोंदले गेले आहे. आतार्पयत सर्वाधिक पाऊस तळोदा तालुक्यात नोंदला गेला आहे.
जिल्ह्यालगतच्या गुजरातमधील तापी जिल्ह्यातील निझर, वेळदा या भागात गुरुवारी अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे गाव व शेती परिसरात पाणीच पाणी झाले होते. परिसरातील नदी, नाल्यांना देखील पूर आला होता. 
गुरुवारी दिवसभर रिपरिप
जिल्हाभरात गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. काही भागात तुरळक तर काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होता. येत्या 24 तासात अर्थात शुक्रवारी देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पावसामुळे पीक परिस्थिती सुधारण्यास आणि पिण्याच्या  पाण्याचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. 
दरम्यान, जिल्ह्यात पावसाची 42 टक्के तूट भरून काढण्यात मदत होणार आहे. राज्यात सर्वाधिक पावसाच्या तूटच्या जिल्ह्यात नंदुरबारचा वरचा क्रमांक असल्यामुळे टंचाई सदृष्य स्थिती होती. 
 

Web Title: Rainfall in Navapur for the second time in a week