शहाद्यातील ग्राहक शिबिरात तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:18 IST2020-06-29T12:17:15+5:302020-06-29T12:18:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागांतर्गत ग्राहकांसाठी तक्रार निवारण शिबिर घेण्यात आले़ विज वितरण कंपनीच्या ...

Rain of complaints at the consumer camp in Shahada | शहाद्यातील ग्राहक शिबिरात तक्रारींचा पाऊस

शहाद्यातील ग्राहक शिबिरात तक्रारींचा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागांतर्गत ग्राहकांसाठी तक्रार निवारण शिबिर घेण्यात आले़ विज वितरण कंपनीच्या कार्यालयात सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेल्या शिबिरात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावत ग्राहकांच्या शंकांचे निरसन केले़
लॉकडाऊन काळात एप्रिल ते जून असे तीन महिन्याचे वीज बिल ग्राहकांना एकत्रितरित्या देण्यात आले आहे़ यातून या बिलांबाबत ग्राहकांनी तक्रारी करत आक्षेप घेतले होते़ ग्राहकांकडून उपस्थित केल्या जाणाºया शंकांचे निरसन करण्यासाठी कंपनीने शहादा येथे हे शिबिर घेतले होते़ कंपनीचे राज्याचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या आदेशानुसार अधिक्षक अधीक्षक अभियंता आर एम चव्हाण यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या शिबिरात कार्यकारी अभियंता किसन पावरा, उप कार्यकारी अभियंता डी. एम. पाटील, सहा. अभियंता सुजित पाटील, वरिष्ठ लेखनिक यांच्यासह मिटर रिडींग करणारे कर्मचारी यांनी ग्राहकांसोबत संवाद साधला़
यावेळी कार्यकारी अभियंता किसन पावरा यांनी सांगितले की, एप्रिल व मे महिन्यात सरासरी बिल देण्यात आलेले आहे. जून महिन्यात आलेल्या वीज बिलात तीन महिन्याचे एकत्रित बिल आल्यामुळे, ग्राहकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. मात्र सरासरी वीज बिल देताना गेल्या वर्षातील स्थितीचा आढावा घेत बिल दिले आहे़ ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक भुर्दंड लावण्यात आलेला नाही़ ग्राहकांनी शंका असल्यास सरळ अधिकाऱ्यांना भेटून माहिती द्यावी़
प्रसंगी सहाय्यक अभियंता पी़टी़पाटील, एम़एम़मन्सुरी, मनीष पवार, आनंदा पवार, संजीव पाटील, विनायक बोरदे, नंदू लोहार यांच्यासह अधिकारी व कर्मचाºयांनी ग्राहकांना माहिती दिली़

शिबिरात मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते़ यावेळी चार टेबल लावून त्याठिकाणी चार अधिकारी व कर्मचारी यांची नियु्क्ती करण्यात आली होती़ सर्व तक्रारी सुरळीतपणे ऐकून घेतल्यानंतर त्यावर योग्य त्या चर्चा करुन दखलपात्र असलेल्या बिलांची दुरुस्ती करण्यात आली़ तर नियमानुसार योग्य असलेल्या बिलांची माहिती देण्यात आली़

Web Title: Rain of complaints at the consumer camp in Shahada