उन्हापासून बचावसाठी पादत्राणांची रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:20 IST2020-05-13T12:20:51+5:302020-05-13T12:20:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा येथील मेनरोडवरील हनुमान गल्लीतील स्टेट बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलांनी रखरखत्या उन्हापासून ...

Queue of footwear to protect from the sun | उन्हापासून बचावसाठी पादत्राणांची रांग

उन्हापासून बचावसाठी पादत्राणांची रांग

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा येथील मेनरोडवरील हनुमान गल्लीतील स्टेट बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलांनी रखरखत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी रांगेत उभे राहण्याऐवजी पादत्राणे ठेवून नंबर लावले होते.
कोरोना विषाणूपासून खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत अक्कलकुवा येथील स्टेट बँकेच्या शाखेबाहेर महिलांनी रांगा लावल्या होत्या. मात्र उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून दुपारच्यावेळी या महिलांनी स्वत:च्या पायातील पादत्राणे बँकेबाहेर असलेल्या गोल वर्तुळात रांगेत ठेवून बँकेतून पैसे काढण्यासाठी नंबर लावले होते. या महिलांनी बँकेच्या जवळपास असलेल्या घरांच्या ओट्यांवर सावलीचा शोध घेतला. वैयक्तिक लाभाच्या विविध शासकीय योजनांचे पैसे लाभार्थींच्या खात्यावर जमा होत आहेत. त्यामुळे सर्वच बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहेत. काही बँकांकडून ग्राहकांना उभे राहण्यासाठी सावलीची व्यवस्था करून देण्यात आली आहे. अक्कलकुवा येथील स्टेट बँकेच्या शाखेबाहेर मात्र सोय नसल्याने महिलांनी बँकेबाहेर असलेल्या गोल वर्तुळात आपापली पादत्राणे ठेवून घरांच्या ओट्यांवर सावलीत थांबण्याचा पर्याय स्वीकारला.

Web Title: Queue of footwear to protect from the sun