वीज कंपनीच्या अभियंत्यास धक्कामुक्की

By Admin | Updated: May 18, 2017 16:22 IST2017-05-18T16:22:17+5:302017-05-18T16:22:17+5:30

महिलेनेदेखील संबधित अधिका:याविरुद्ध अलि शिविगाळ केल्याप्रकरणी तक्रारी दिली आहे

Pushing the electricity company's engineer | वीज कंपनीच्या अभियंत्यास धक्कामुक्की

वीज कंपनीच्या अभियंत्यास धक्कामुक्की

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 18 -  वीज मीटर तपासणीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांना धक्काबुकी करून शिविगाळ केल्याप्रकरणी नंदुरबारातील एकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिलेनेदेखील संबधित अधिका:याविरुद्ध अलि शिविगाळ केल्याप्रकरणी तक्रारी दिली आहे.
वीज वितरण कंपनीतर्फे वीज मीटर तपासणीची मोहिम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत  अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप राधेश्याम सावंत हे साक्रीनाका परिसरातील पंकज नामदेव चौधरी यांच्या घरी मीटर तपासणीसाठी गेले. त्यांचे मीटर मंदगतीने सुरू असल्यामुळे त्यांनी वीज मीटर जप्तीचा पंचनामा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पंकज चौधरी यांनी त्यांना विरोध करून सरकारी कामात अडथळा आणला तसेच धक्काबुकी करून शिविगाळ केली. शिवाय केलेला पंचनामादेखील फाडून टाकला. याबाबत प्रदीप राधेश्याम सावंत यांनी फिर्याद दिल्याने पंकज नामदेव चौधरी यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे व दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच घरातील महिलेनेदेखील फिर्याद दिली आहे. प्रदीप सावंत हे वीज मीटर तपासणीच्या नावाखाली घरी आले. त्यावेळी त्यांनी वीज बील घेवून येण्याचे सांगितले. घरात कुणी नसल्याचे पाहुण त्यांनी आपल्याला अलि शिविगाळ केली शिवाय ठार मारण्याचीदेखील धमकी दिली. महिलेच्या फिर्यादीवरून अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप सावंत यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

Web Title: Pushing the electricity company's engineer