विसरवाडीतील दोघांना दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:13 IST2020-05-06T12:13:24+5:302020-05-06T12:13:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे लॉकडाऊन काळात दुकान सुरु ठेवणारा तसेच मास्क न लावता वावरणाऱ्याला ...

Punishment to two in Visarwadi | विसरवाडीतील दोघांना दंडाची शिक्षा

विसरवाडीतील दोघांना दंडाची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे लॉकडाऊन काळात दुकान सुरु ठेवणारा तसेच मास्क न लावता वावरणाऱ्याला न्यायालयाने दंडाची शिक्षा सुनावली आहे़ नवापुर न्यायालयाने हा निकाल दिला़
विसरवाडी येथील रजनीकांत बद्रीप्रसाद अग्रवाल याने १५ एप्रिल रोजी इलेक्ट्रीक साहित्य विक्रीचे दुकान सुरु ठेवत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले होते़ विसरवाडी पोलीसांनी अग्रवाल याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला होता़ याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप गावीत यांनी नवापुर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आऱसी़बहीरवाल यांनी रजनीकांत अग्रवाल यास दोषी धरत दोन हजार रुपयांचा दंड केला होता़
१५ रोजीच विसरवाडी येथील राजेश अग्रवाल याने तोंडावर मास्क न बांधता माल विक्री करत असल्याचे पोलीसांना दिसून आले होते़ त्याच्याविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी नवापुर न्यायालयात न्यायमूर्ती बहीरवाल यांच्यासमोर खटला सुरु होता़ राजेश अग्रवाल हा दोषी आढळून आल्याने त्याला दोन हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास पाच दिवसांचा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली़
नवापुर न्यायालयाने विसरवाडी येथील दोघांच्या वर्तनावर ताशेरे ओढत समाजातील इतर नागरिकांनाही साथरोग काळात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी काढलेल्या आदेशांचे गांभिर्याने पालन करण्याचे सूचित केले आहे़ शिक्षा सुनावताना न्यायमूर्ती बहिरवाल यांनी कायद्याचे उल्लंघन करणे हे गंभीर आणि दंडनीय असून सर्वांनीच कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे सूचित केले आहे़

Web Title: Punishment to two in Visarwadi