मोरकरंजा व पानबारा परिसरातील नुकसानीचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST2021-05-23T04:29:50+5:302021-05-23T04:29:50+5:30

मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे पानबारा व मोरकरंजा भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मोकरंजा शिवारातील धेडुबाई धनसिंग गावीत, ...

Punchnama of loss in Morkaranja and Panbara area | मोरकरंजा व पानबारा परिसरातील नुकसानीचा पंचनामा

मोरकरंजा व पानबारा परिसरातील नुकसानीचा पंचनामा

मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे पानबारा व मोरकरंजा भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मोकरंजा शिवारातील धेडुबाई धनसिंग गावीत, पानबारा शिवारातील हिरालाल बोठ्या गावीत, जालसिंग बोट्या गावीत, देशमा गावीत, दशरथ पंडित गावीत, जेरमा गावीत या सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात केळीची रोपेे लावली होती. वर्षभर मोठ्या मेहनतीने केळी पिकाची काळजी घेत खत, पाणी व्यवस्थापन करून केळी पीक फळधारणेसाठी तयार झाले होते. परंतु हातातोंडाशी आलेल्या पिकाचे तोक्ते वादळामुळे पूर्ण नुकसान झालेे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे खानापूर येथील तलाठी अमित गावीत, कृषी सहाय्यक प्रशांत कुवर व सुभाष गायकवाड यांनी पंचनामा केला. यात वेळी ५.११ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

Web Title: Punchnama of loss in Morkaranja and Panbara area