शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम विभागाने काम प्रभारी अधिकाऱ्यांनावर सुरू आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

तळोदा : येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंत्याची इतरत्र बदली झाल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले हे कार्यालय गेल्या ...

तळोदा : येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंत्याची इतरत्र बदली झाल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले हे कार्यालय गेल्या वर्षभरापासून प्रभारीवर चालू आहे. साहजिकच प्रमुख अधिकाऱ्याअभावी रस्ते, पुलांची कामेदेखील रामभरोसेच आहेत. संबंधित यंत्रणेने दखल घेऊन कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तळोदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन उपविभागीय अभियंता पी.जे. वळवी यांची गेल्या ऑगस्ट महिन्यात शहादा येथील बांधकाम कार्यालयात बदली झाली आहे. त्यामुळे येथे त्यांचा जागी नवीन अधिकारीच दिला नाही. याउलट या कार्यालयाच्या अतिरिक्त भार नंदुरबार येथील अधिकारी ई.जी. जगताप यांच्याकडे देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडेच कार्यभार आहे. त्यामुळे जनतेच्या दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले हे कार्यालय प्रभारीवर सुरू आहे. संबंधित अधिकारी कामाच्या अतिरिक्त ताणामुळे न्याय देऊ शकत नाही. इकडे तालुक्यात अर्थसंकल्पीय रस्ते, फरशा, पुलांच्या कामाबरोबरच आमदार निधीतील अनेक कामे सुरू आहेत. साहजिकच ही कामे रामभरोसे चालू आहेत. विशेष म्हणजे इतर कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे शुक्रवारी कार्यालयाकडे फेरफटका मारला असता शिपायाव्यतिरिक्त अक्षरशः शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून आले होते. अगदी कामांसाठी लोक या कार्यालयाकडे हेलपाटे मारत असतात. तरीही कुणीच भेटत नाही. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याचा तपास केला, तर सरळ साइटवर गेल्याचे सांगितले जात असते. त्यामुळे लोकांना निराश होऊन परतावे लागते. इतर प्रमुख अधिकाऱ्यांचादेखील वचक नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी प्रवृत्ती बळावली आहे. वास्तविक वर्षभरापासून प्रमुख अधिकाऱ्याचे पद रिक्त असताना नियमित अधिकारी दिला जात नाही. शिवाय या जिल्ह्याचे पालकत्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे असताना येथे अधिकाऱ्यांची वानवा असल्याने जनतेमधून नाराजीच्या सूर व्यक्त केला जात आहे. निदान ज्या- ज्या प्रमुख कार्यालयात अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तेथे तरी दुसऱ्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी जनतेची मागणी आहे.

इतर अभियंत्यांची पदेही रिक्तच

तळोदा सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंत्यांच्या जागादेखील रिक्तच आहेत. येथे पाच पदे मंजूर आहेत; परंतु प्रत्यक्षात दोनच अभियंते कार्यरत आहेत. शिवाय ही पदे दोन वर्षांपासून रिक्त आहेत. अजूनही इतरांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही. अतिरिक्त ताणामुळे साहजिकच कामांकडेदेखील पाहिजे तसे लक्ष दिले जात नसल्याचा नागरिकांच्या आरोप आहे. त्यामुळे कामांच्या दर्जाबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. अभियंत्यांच्या अडचणीमुळे ठेकेदारांची मनमानीदेखील वाढली आहे.

शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंत्यांच्या वाढत्या रिक्तपदांची कार्यवाही सुरू केली आहे. थोड्या दिवसांत या बांधकाम कार्यालयासदेखील कायमस्वरूपी अधिकारी मिळणार आहे.

-ई.जी. जगताप, प्रभारी उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, तळोदा