शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात घरकुलांचे प्रस्ताव रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत शहरातील दारिद्र्यरेषेखालील व गरीब, गरजू घटकातील लाभार्थ्यांसाठी तळोदा नगरपालिकेमार्फत ही योजना राबवली जात ...

केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत शहरातील दारिद्र्यरेषेखालील व गरीब, गरजू घटकातील लाभार्थ्यांसाठी तळोदा नगरपालिकेमार्फत ही योजना राबवली जात आहे. साहजिकच योजनेच्या लाभासाठी शहरातील १८५ लाभार्थ्यांनी पालिकेकडे संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव दाखल केले आहेत. तथापि, ही प्रकरणे मंजुरीअभावी पडून असल्याचे या लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. वास्तविक त्यांच्या प्रकरणात काय त्रुटी आहेत हेही त्यांना कळायला मार्ग नाही. त्यावर कार्यवाही झाली तर लाभार्थीदेखील आपल्या प्रकरणातील कागदपत्रांची पूर्तता करू शकतील. त्यामुळे पालिकेने तातडीने कार्यवाही करून प्रस्ताव मार्गी लावावेत, अशी मागणी या दोन्ही नगरसेवकांनी पालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावा यांच्याकडे केली आहे.

१०० लाभार्थ्यांचा शेवटचा हप्ताही थकला

मागील डीपीआरमध्ये मंजूर झालेल्या १०० लाभार्थ्यांच्या पाचव्या हप्त्याची रक्कमदेखील थकली आहे. त्यामुळे त्यांची घरकुलांची कामे रखडली आहेत. याबाबत चौकशी करून ही थकलेली रक्कम तातडीने लाभार्थ्यांना देण्यात यावी. कारण पैशांअभावी लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

लाभार्थ्यांच्या प्रस्तावात जागेच्या त्रुटी

घरकुल योजनेसाठी या लाभार्थ्यांनी दाखल केलेल्या प्रस्तावात जागेच्या त्रुटी असल्याचे पालिकेच्या संबंधित विभागाने सांगितले आहे. कारण लाभार्थी राहतात त्या घराची जागा त्यांच्या नावावर नाही. हीच मुख्य अडचण निर्माण झाली आहे. याशिवाय ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या पाचव्या हप्त्याची रक्कम थकलेली आहे त्या उर्वरित रकमेची शासनाकडे मागणी केली आहे. तब्बल सहा वेळा यासाठी पत्रव्यवहारदेखील केला आहे. मात्र अजूनही रक्कम पालिकेस प्राप्त झालेली नाही. ही रक्कम आल्याबरोबर लाभार्थ्यांना वर्ग केली जाईल, असेही सांगण्यात आले.

शहरातील गरीब लाभार्थ्यांचे घरकुलांचे प्रस्ताव मंजुरीअभावी पडून आहेत. पालिकेने त्यावर कार्यवाही केली तर लाभार्थ्यांनाही कागदपत्रांची पूर्तता करता येईल. मात्र कार्यवाही होत नसल्यामुळे ते सारखे हेलपाटे मारत असतात.

- अनिता परदेशी, नगरसेविका, तळोदा पालिका