प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:32+5:302021-04-02T04:31:32+5:30

यावेळी तळोदा वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, शैलेंद्र गवते, कार्यालयातील लेखा अधिकारी हिरालाल जिपकाटे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन ...

Project Officer Avishant Panda felicitated | प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांचा सत्कार

प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांचा सत्कार

यावेळी तळोदा वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, शैलेंद्र गवते, कार्यालयातील लेखा अधिकारी हिरालाल जिपकाटे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन नवनाथ जानगर, सुवर्णा सोलंकी, एस. एम. चौधरी व सर्व प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुवर्णा सोलंकी यांनी केले.

याप्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन. डी. जानगर, नियोजन अधिकारी तोरावणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण एस. आर. सोळंकी, संजय चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करत अविशांत पांडा यांच्या कार्यकाळाला उजाळा दिला. प्रकल्प कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक अमित वसावे, शिक्षण विस्तार अधिकारी एन.डी. ढोल, बी.आर. मुगळे, जी.डी. अखडमल, उपलेखापाल डी.डी. दावडे आदींनी प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना अविशांत पांडा यांनी त्यांच्या कार्यकाळात सहकार्य केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Web Title: Project Officer Avishant Panda felicitated