शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार, तळोदा, शहादा, नवापूर मुख्यालयाच्या ठिकाणी प्राथमिक शाळा बंदच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST

दुर्गम आणि ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा सगळीकडे उपलब्ध नसल्याने ऑनलाइन पध्दतीने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे या ...

दुर्गम आणि ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा सगळीकडे उपलब्ध नसल्याने ऑनलाइन पध्दतीने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता अक्राणी व अक्कलकुवासारख्या दुर्गम भागातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

शाळा सुरु करताना कोविड १९ बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा या तालुका मुख्यालयाच्या गावात कोविड-१९ चे रुग्ण असल्याने या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा बंद राहतील. तसेच या मुख्यालयाच्या ठिकाणाहून विद्यार्थी आजूबाजूच्या ग्रामीण भागातील शाळेत जात असतील तर ग्रामीण भागातील अशा शाळादेखील बंद राहतील. इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करतांना आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनाचे मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्यात यावेत. ग्रामीण भागातील शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या पालकासमवेत बैठक आयोजित करून विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना कोविड १९ संदर्भातील आव्हाने व भूमिकाबाबत माहिती द्यावी. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना हँड सॅनिटायझर, साबण, मास्क उपलब्ध करून देण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायतीचे सहाय्य घेण्यात यावे. यासाठी वेळोवेळी विद्यार्थी व पालक यांचे प्रबोधन करावे, आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा तसेच समाज कल्याण विभागाच्या आश्रमशाळा सुरू करण्यासंदर्भात संबंधित विभागांनी पालकांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा. सद्यस्थितीत या शाळांतील विद्यार्थी नजीकच्या सुरू असलेल्या शाळांमध्ये शिक्षणासाठी जाऊ शकतील. त्यासाठी प्रस्तुत शाळांच्या मुख्याध्यापकांनी अशा विद्यार्थ्यांची यादी नजीकच्या ज्या शाळेत हे विद्या‌र्थी जाऊ इच्छीत असतील अशा शाळांच्या मुख्याध्यापकांना घ्यावी. एखाद्या गावात कोविड-१९ चा रुग्ण आढळून आल्यास सदर गावातील शाळा पाच दिवस बंद ठेवण्यात यावी आणि आणखी रुग्ण आढळून न आल्यास ती परत सुरू करावी. शाळा सुरू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे. वर्गखोली तसेच स्टाफ रूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराचे पालन करून करावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी.

शाळेच्या दर्शनी भागावर मास्कचा वापर करण्यासंदर्भात सूचना प्रदर्शित करावे, थुंकण्यावरील बंदीचे काटेकोरपणे पालन करावे, शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फुटाचे अंतर राखले जाईल, अशी विशिष्ट चिन्हे, वर्तुळ काढण्यात यावीत. शारीरिक अंतर राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात. परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे गर्दी होऊ शकते. अशा कार्यक्रमांच्या आयेाजनावर निर्बंध असेल. शिक्षक पालक यांच्या बैठका ऑनलाइन घ्याव्यात. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मूल्यांकनाकरिता विशिष्ट योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी. विद्यार्थी,पालक शिक्षक व समाजातील सदस्य यांच्यात जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने वैयक्तिक स्वच्छता व कोविड-१९ प्रतिबंधासाठी आवश्यक स्वच्छता विषयक सवयी व कोरोना संदर्भातील गैरसमजुतीविषयक जनजागृती करावी.

विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल, पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिके बंद करण्यात यावीत, शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणीबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे. तसेच आदेशात नमूद सर्व आवश्यक सूचनाचे काटेकारेपणे पालन करण्यात यावे व स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक मार्गदर्शक सूचना द्याव्यात, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.