उत्तर महाराष्ट्र जल परिषदेत मान्यवरांकडून प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST2021-05-17T04:29:14+5:302021-05-17T04:29:14+5:30

या परिषदेत नदी नांगरणीचा अनोखा प्रयोग राबवून सिंचनाचा महाराष्ट्रातला नवा आयाम राबविणार्‍या शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचा जलसंधारणातला प्रवास ...

Prabodhan by dignitaries at North Maharashtra Jal Parishad | उत्तर महाराष्ट्र जल परिषदेत मान्यवरांकडून प्रबोधन

उत्तर महाराष्ट्र जल परिषदेत मान्यवरांकडून प्रबोधन

या परिषदेत नदी नांगरणीचा अनोखा प्रयोग राबवून सिंचनाचा महाराष्ट्रातला नवा आयाम राबविणार्‍या शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचा जलसंधारणातला प्रवास डॉ. कैलास चव्हाण यांनी मांडला. सातपुडा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी स्व. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन, कारखाना व पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायत यांचे समग्र पाणी नियोजनातली भूमिका याविषयी विवेचन मांडणी विनोद पाटील यांनी केली. जल, जंगल व जमीन यांचा शाश्वत वापर याविषयी लोकसंघर्ष मोर्चाच्या समन्वयक प्रतिभा शिंदे यांनी मते मांडली. प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्याचा जलआढावा आणि अक्राणी तालुक्यातील पाणी समस्या याविषयी भूमिका मांडली. जलकर्मी भिला पाटील यांनी नर्मदेचे बॅक वाॅटर व मालकातर धरणाची माहिती दिली. उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे वीरेंद्र वळवी यांनी जल चळवळ समर्थपणे पुढे नेण्याचे प्रतिपादन केले. उत्तर महाराष्ट्र विकास मंडळाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब हटकर यांनी खान्देशसाठीचे हे जल आंदोलन पुढे नेण्याची गरज समारोपीय मनोगतात केली. मंडळाचा उद्देश व कार्यविस्तार यांची माहिती प्रास्ताविकात मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी दिली. सूत्रसंचालन जल यात्रेचे कार्याध्यक्ष एन. एस. भामरे यांनी केले. कार्यक्रमासाठी मंडळाचे कोषाध्यक्ष ए. जी. पाटील, दीपक पाटील, सुरेश पाटील, राजेंद्र जाधव, नरेंद्र पाटील, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे तंत्र सहाय्य तंत्रज्ञ विनोद भानुशाली तसेच स्थानिक स्तरावर अनिल पाटील व उल्हास सोनवणे, आदींनी सांभाळले.

Web Title: Prabodhan by dignitaries at North Maharashtra Jal Parishad