प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा पदभार डॅा.राहुल चौधरी यांच्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST2021-02-17T04:37:55+5:302021-02-17T04:37:55+5:30

नंदूरबार : प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा प्रभारी पदभार डॅा.राहुल चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. प्राथमिक शाळा ...

The post of Primary Education Officer is held by Dr. Rahul Chaudhary | प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा पदभार डॅा.राहुल चौधरी यांच्याकडे

प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा पदभार डॅा.राहुल चौधरी यांच्याकडे

नंदूरबार : प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा प्रभारी पदभार डॅा.राहुल चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. प्राथमिक शाळा सुरू करण्याचे शासनाकडून अद्याप काहीही सूतोवाच नाही. त्यामुळे ॲानलाईन शिक्षणावर भर दिला जात असल्याची माहिती डॅा.चौधरी यांनी दिली.

डॉ.राहुल चौधरी यांनी यापूर्वी देखील प्राथमिक शिक्षणाधिकारी पद यशस्वीपणे सांभाळले आहे. त्यांना असलेल्या अनुभावाच्या आधारावर त्यांच्याकडे पुन्हा ही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला. त्यानुसार डॉ.चौधरी यांनी हा पदभार स्वीकारला आहे. याबाबत बोलतांना डॉ.चौधरी यांनी सांगितले, प्राथमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात काहीही हालचाली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ॲानलाईन शिक्षणावरच भर दिला जात आहे. शिक्षक शाळांवर जाऊन नियमितपणे विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. शाळांच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा देखील घेतला जात आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग दक्ष असल्याचेही डॉ.राहुल चौधरी यांनी सांगितले.

Web Title: The post of Primary Education Officer is held by Dr. Rahul Chaudhary