पोस्ट कार्यालय व बँका पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST2021-05-19T04:31:50+5:302021-05-19T04:31:50+5:30

जिल्ह्यातील सर्व बँका व पोस्ट ऑफिस हे नियमित वेळेत व १०० टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील, मुख्य प्रवेशद्वारावर ...

Post offices and banks allowed to start at full capacity | पोस्ट कार्यालय व बँका पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

पोस्ट कार्यालय व बँका पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

जिल्ह्यातील सर्व बँका व पोस्ट ऑफिस हे नियमित वेळेत व १०० टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील, मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा. शाखेमध्ये एका वेळेस फक्त ५ ग्राहकांना प्रवेश दिला जाईल. बँक आणि पोस्ट कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच ग्राहक यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. यात शारीरतिक अंतर ठेवणे, चेहऱ्यावर मास्क लावणे, हात सॅनिटाइज करणे आदी बाबींचा समावेश आहे. ग्राहकांनी अत्यावश्यक काम असेल तरच बँकेच्या शाखेत यावे. सर्दी, ताप, खोकला आदीचा त्रास असलेल्या ग्राहकांनी बँकेत येणे टाळावे. याबाबत बँकेत दर्शनी भागावर सूचना फलक लावावा. ग्राहकांनी बँकेच्या काऊंटरपासून ३ ते ५ फुटांचे अंतर ठेवावे. पोस्ट व बँकांमध्ये एका काऊंटरवर एका वेळी एकच ग्राहक हजर राहील याची दक्षता घ्यावी, उर्वरित ग्राहकांना पोस्ट ऑफिस/बँकेच्या बाहेर दोन ते तीन फूट अंतरावर थांबण्याची व्यवस्था करावी. एटीएममध्ये एकावेळी एकच ग्राहक प्रवेश करेल व उर्वरित ग्राहकांना दोन ते तीन फूट अंतरावर थांबण्यास सांगावे. एटीएम मशीनचे दररोज निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सर्व बँकांनी शाखेतील एटीएम, कॅश/चेक डिपॉजिट मशीन, पासबुक प्रिंटर्स व शाखेतील उपकरणे यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. बँक इमारत व परिसरामध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय, एटीएम कॅश डिपॉजिट मशीन या बँकेच्या इतर सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्याबाबत बँकांनी प्रेरित करावे, असे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात नमूूद करण्यात आले आहे. दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे.

Web Title: Post offices and banks allowed to start at full capacity