शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रहदारीला अडथळा आणणाऱ्या 15 व्यावसायिकांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : रस्त्यावर हातगाड्या लावून रहदारीस अडथळा आणणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मोहीम हाती घेतल्याने व्यावसायिकांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : रस्त्यावर हातगाड्या लावून रहदारीस अडथळा आणणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मोहीम हाती घेतल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या वेळी १५ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर न्यायालयामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.तळोदा शहरात हातगाडीधारक व्यावसायिक आपल्या हातगाड्या रस्त्यावर उभ्या करीत असतात. साहजिकच यामुळे वाहतुकीस अडथळा ठरून वाहतुकीची कोंडी होत असते. विशेषत: बसस्थानक रस्ता, स्मारक चौक, मेन रोड, हातोडा रोड अशा गजबजलेल्या ठिकाणी हे व्यावसायिक मुद्दामहून आपल्या हातगाड्या उभ्या करीत असतात. त्यांना अनेक वेळा पोलिसांनी ताकीददेखील दिली आहे. परंतु, तेवढ्यापुरते बाजूला काढून पुन्हा जैसे थे उभे करतात. साहजिकच सातत्याने कोंडी निर्माण होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात होती. पोलिसांनी अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मोहीम शुक्रवारी म्हणजे बाजाराच्या दिवशी हाती घेतली आहे. तब्बल १५ व्यावसायिकांवर कारवाई केली. ही कारवाई रस्त्यावर हातगाड्या लावून रहदारीस अडथळा निर्माण करण्याबाबतच्या कलमान्वये करण्यात आली. एकाच वेळी एवढ्या संख्येने व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई केल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर केसेस करून त्यांना न्यायालयात दंडात्मक कारवाई करण्याचे नोटीसमध्ये सूचित केले आहे. या व्यावसायिकांवर साधारण एक हजार ५०० ते दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात असते. पोलिसांनी रहदारीस अडथळा आणणाऱ्या अशा हातगाडीधारकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु, या मोहिमेत सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मोकाट गुरांबाबतही ठोस कारवाई करावीसतत रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या मोकाट गुरांच्या बाबतही पोलिसांनी कडक भूमिका घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कारण, सदर गुरांच्या मालकांविषयी पालिकेने सपशेल गुडघे टेकल्यामुळे या पशुपालकांची मनमानी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी एक मोटारसायकलस्वार बसस्थानक रस्त्यावरून जात असताना त्याच्या वाहनापुढे मोकाट जनावरे आलीत. त्यामुळे तो जायबंदी होऊन गंभीर जखमी झाला होता. असे असताना पालिकेने मोकाट गुरांच्या बंदोबस्ताबाबत गांधारीचा अवतार घेतला आहे. निदान, पोलिसांनी तरी अशा पालकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तमाम तळोदेकरांची मागणी आहे.

अतिक्रमण व पर्यायी रस्त्याबाबत पालिकेला पत्र  शहरातील वीज कार्यालयाच्या मागच्या बाजूने जाणाऱ्या हातोडा रस्त्याकडील एका ठिकाणी मोठा गतिरोधक पालिकेने बसविला आहे. येथून गाड्या काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असते. शिवाय, हा गतिरोधक अडथळादेखील ठरत आहे. त्यामुळे अवजड वाहनेही शहरातील बाजारपेठेकडूनच जात असतात. साहजिकच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांनासुद्धा जीव मुठीत घालून मार्गक्रमण करावे लागत असल्याची व्यथा आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी नगरपालिकेस पत्र देऊन पर्यायी रस्ता देण्याचे सुचविले आहे. याशिवाय  बाजारपेठेत व्यावसायिक आपल्या दुकानाबाहेर माल ठेवून अतिक्रमण करीत असतात. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांना आपले वाहन व पाच कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. आता पालिकेने या प्रकरणी सकारात्मक भूमिका घेऊन पोलिसांना सहकार्य करण्याची अपेक्षा नागरिकांनी केली आहे.