हॅाटेलवरील छाप्यात २७ हजाराचे मद्य पोलिसांकडून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:29 IST2021-05-22T04:29:17+5:302021-05-22T04:29:17+5:30

नंदुरबार : कोळदा शिवारातील पळाशी रोडवरील हॅाटेल त्रिशावर छापा टाकून पोलिसांनी तेथून २७ हजारांचे मद्य जप्त केले आहे. संचारबंदीच्या ...

Police seize Rs 27,000 worth of liquor in a raid on a hotel | हॅाटेलवरील छाप्यात २७ हजाराचे मद्य पोलिसांकडून जप्त

हॅाटेलवरील छाप्यात २७ हजाराचे मद्य पोलिसांकडून जप्त

नंदुरबार : कोळदा शिवारातील पळाशी रोडवरील हॅाटेल त्रिशावर छापा टाकून पोलिसांनी तेथून २७ हजारांचे मद्य जप्त केले आहे. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॅाटेल सील करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, पळाशी रोडवरील हॅाटेल त्रिशा संचारबंदी काळात देखील सुरू असल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तेथे परमीटशिवाय देशी, विदेशी दारू विक्री होत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी एकुण २७ हजार ३५० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. हॅाटेल मालक सचिन राधेशाम परदेशी व मॅनेजर नगीन मदन पाडवी रा.कोळदा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.

ही कारवाई पोलीस निरिक्षक अर्जून पटले, उपनिरिक्षक प्रशांत राठोड, जमादार सुदाम नावडे, सुनील येलवे, योगेश निकम, पितांबर जगदाळे, कैलास मोरे, धनंजय नागरे यांच्या पथकाने केली.

Web Title: Police seize Rs 27,000 worth of liquor in a raid on a hotel