शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लग्न समारंभांसाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:21 IST

पोलीस विभाग, मुख्याधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, अन्न प्रशासन विभाग यांनी उपाहारगृहे, रेस्टॉरंट, बार, इत्यादी आदरातिथ्य सेवा ५० टक्के क्षमतेसह ...

पोलीस विभाग, मुख्याधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, अन्न प्रशासन विभाग यांनी उपाहारगृहे, रेस्टॉरंट, बार, इत्यादी आदरातिथ्य सेवा ५० टक्के क्षमतेसह सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहतील यांची खातरजमा करावी. कुलसचिव, कॉलेजचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मास्कचा वापर करतात का हे तपासावे. प्रत्येक वर्गात सॅनिटायझर अथवा हात धुण्यासाठी साबण उपलब्ध ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. तसेच संशयित विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी.

शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, मुख्याधिकारी यांनी खासगी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा केंद्रे इत्यादीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर होत आहे किंवा नाही यांची तपासणी करावी. पोलीस विभाग, मुख्याधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल याठिकाणी सर्व दुकानदार, त्याचे कर्मचारी, विक्रेते यांना मास्क लावणे बंधनकारक करावे. तसेच प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर उपलब्ध राहील व एकाचवेळी केवळ ५ ग्राहकच उपस्थित राहतील, याबाबत कार्यवाही करावी.

सर्व कार्यालय प्रमुखांनी शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक करावे. सॅनिटायझर वापर, हात धुण्यासाठी साबण तसेच कर्मचाऱ्याने मास्क वापरणे तसेच दुपारचे जेवण एकत्रित करणे याबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करावे. पोलीस विभाग, जिल्हा परिषद, उपविभागीय दंडाधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी मास्कचा वापर न करणाऱ्यावर पोलीस विभागामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या फिरत्या पथकामार्फत दंड आकारणी करण्याबाबत निर्देश द्यावेत.

पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आगार व्यवस्थापक, रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांनी रेल्वे, एसटी बसेस, ट्रॅव्हल्स, रिक्षा, कॅब, कालीपिली यांना अनुज्ञेय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्याबाबत बंदी करावी. जास्त प्रवासी बसल्यास दंडात्मक कार्यवाही करावी.

मुख्याधिकारी नगरपालिका, नगर पंचायत यांनी सार्वजनिक उद्याने फक्त सकाळी ५ ते ९ यादरम्यान व्यायाम, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठीच खुले ठेवावेत, परंतु सदरच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मुख्याधिकारी,करमणूक कर निरीक्षक, संबंधित व्यवस्थापकांनी सिनेमागृहामधील सर्व प्रेक्षक, कर्मचारी यांना मास्कचा वापर करण्याबाबत सूचना द्याव्यात.

मुख्याधिकारी, आगार व्यवस्थापक, रेल्वे स्टेशन व्यवस्थापकाने बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक प्रसाधन गृहे व इतर ठिकाणच्या आपल्या कार्यक्षेत्रात वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे. कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेले निर्देश, नियमावली, कार्यप्रणाली आलेले आदेश लागू राहतील. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.