शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटील युवकाचे डॉक्टरने केले अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बोगस डॉक्टर असल्याचे बोलल्याचा राग येवून पोलीस पाटील युवकास मारहाण करीत त्याचे अपहरण केल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोगस डॉक्टर असल्याचे बोलल्याचा राग येवून पोलीस पाटील युवकास मारहाण करीत त्याचे अपहरण केल्याची फिर्याद राणीपूर, ता.शहादा येथील पोलीस पाटलाच्या आईने म्हसावद पोलीस ठाण्यात दिली. १७ जून रोजी दुपारी ही घटना घडली. याबाबत संबधीत डॉक्टराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरेंद्र करणसिंग रावताळे, रा.राणीपूर, ता.शहादा असे अपहरण झालेल्या पोलीस पाटील युवकाचे नाव असून दिनेश आपसिंग पावरा, रा.वडफळ्या, ता.धडगाव असे संशयीत आरोपीचे नाव आहे. याबाबत कुसुमबाई करणसिंग रावताळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राणीपूर येथे वैद्यकीय व्यवसाय करणारा दिनेश आपसिंग पावरा यांना सुरेंद्र रावताळे हा पोलीस पाटील युवक बोगस डॉक्टर असल्याचे बोलला. त्यामुळे पावरा यांना त्याचा राग आला होता. त्याचा राग मनात कायम धरून त्याच्याशी जवळीक साधली. सुरेंद्र याच्या आईस पावरा याने भेटून डॉक्टरकी व्यवसायात अडथळा आणला तर त्याचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही अशीही धमकी दिली होती. असे असतांनाही सुरेंद्र याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे १७ रोजी दुपारी दिनेश पावरा यांनी सुरेंद्र यास फूस लावून दुचाकीवर (क्रमांक एमएच ३४-३६९९) बसवून तोरणमाळ परिसरात नेले. तेथे त्याला मारहाण करून डांबून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.कुसूमबाई यांच्या फिर्यादीवरून दिनेश आपसिंग पावरा यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार देविदास सोनवणे करीत आहे.