शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग १८ मधील शौचालयांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

नंदुरबार : शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने ...

नंदुरबार : शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील नवनाथ नगर परिसरातील पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. स्थानिक नगरसेवकांसह नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० -२१ मध्ये मोठा गाजावाजा करून शहरात स्वच्छतेचा डंका पिटला जात आहे. मात्र सध्या कोरोना परिस्थितीत प्रभाग क्रमांक १८ मधील पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयांची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

देखभालीच्या नावाखाली सेवा फाउंडेशन या संस्थेच्या ठेकेदाराने लाखो रुपये घेऊन दुर्लक्ष केले आहे. ३० सीटच्या असलेल्या या सार्वजनिक शौचालयातील स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. सार्वजनिक शौचालय वापरणे हा माझा अधिकार असे घोषवाक्य लिहून शहरात इतर ठिकाणचे शौचालयांची स्थिती काही अंशी बरी असल्याचे सांगण्यात येते. मात्र झोपडपट्टी आणि गरीब वसाहत असलेल्या नवनाथ नगर भागातील सार्वजनिक शौचालयांची दरवाजे, खिडक्या, फरशी तुटली असून पाण्याची देखील बोंबाबोंब असल्याने दैनंदिन उपयोगासाठी स्वच्छते अभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गेल्या वर्षभरापासून या सार्वजनिक शौचालयांचे कुणी वाली नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवनाथनगर भागातील पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.