शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
2
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
3
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
4
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
5
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
6
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
7
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
8
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
9
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
10
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
11
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
12
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
13
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
14
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
15
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
16
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
17
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
18
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
19
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
20
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यूमुळे जिल्ह्यात पीन ड्रॉप सायलेन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या एकदिवसाच्या जनता कर्फ्यूला जिल्ह्यात १०० ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या एकदिवसाच्या जनता कर्फ्यूला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे़ नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापुर या सपाटीवरील शहरांसह सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव, मोलगी तोरणमाळ ही गावेही पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत़नंदुरबारशहरातील विविध भागात सकाळी सातवाजेपासून पूर्णपणे कर्फ्यूचे पालन करण्यात आले़ यात नागरिकांनी सहभाग घेत सात वाजेपूर्वी गरजेची कामे पूर्ण करुन घेत घरात राहणे पसंत केले होते़ शहरात औषधी विक्रीची दुकाने, खाजगी दवाखाने, दूधविक्रेते, पेपरविक्रेते, जिल्हा रुग्णालय तसेच पालिका रुग्णालयाचे कामकाज नियमित सुरु होते़ सकाळी आठ नंतर पेपर विक्रेते घरी गेले होते़ तर दूध विक्रेत्यांनी १० वाजेनंतर कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदवला़ रेल्वेस्टेशन व बसस्थानक याठिकाणी संपूर्णपणे शुकशुकाट होता़ बसस्थानकातून एकही बस सुटलेली नव्हती़ खाजगी बसेसही शहरात आलेल्या नसल्याचे दिसून आले़ दरम्यान रेल्वेस्थानकात पोलीस व आरोग्य पथक तैनात करुन रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांची तपासणी करण्यात आली़ पोलीसांकडून वाका ते नंदुरबार दरम्यान पथराई फाटा, धुळे चौफुली, सिबी पेट्रोलपंप यासह विविध भागात पोलीस बंदोबस्त तैनात करुन आढळून येणाºया एखाद-दुसºया वाहनधारकाची तपासणी करुन माहिती घेतली होती़शहादाशहरातील विविध भागात सकाळपासूनच शुकशुकाट होता़ तूपबाजार, नेहमी गजबजलेला बसस्थानक परिसर, मोहिदा रोड, सप्तशृंगी माता मंदिर परिसर यासह बºहाणपूर-अंकलेश्वर महामार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता़ शहादा पोलीस ठाण्याकडून ठिकठिकाणी पोेलीस कर्मचारी नियुक्त करुन शहरात तपासणी सुरु होती़तळोदाशहरातील मुख्य स्मारक चौकासह सर्वच ठिकाणी शुकशुकाट होता़ ग्रामीण भागातून येणाºया जाणाºया बसेस तसेच वाहने बंद असल्याने शहरात प्रथमच शुकशकाट होता़ औषधी विक्रेत्यांव्यतिरिक्त शहरात एकही दुकान खुले नव्हते़अक्कलकुवागुजरातच्या सिमेवर असलेल्या अक्कलकुवा शहरात सकाळपासून जनता कफ्यूचे पालन सुरु होते़ शहरातील नागरिक सकाळपासून घराबाहेर पडलेच नव्हते़ दरम्यान शहरापासून काही अंतरावर असलेल्या खापर आणि गव्हाळी येथील राज्य सिमा तपासणी नाक्यावर आरोग्य, प्रादेशिक परिवहन आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाकडून गुजरात राज्यातून येणाºया वाहनांची काटेकोरपणे तपासणी सुरु होती़ यात अद्यापही संशयित रुग्ण आढळून आलेला नसल्याची माहिती आहे़नवापुरशहरातील बसस्थानक परिसर, लाईट बाजार, मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विसरवाडी, खांडबारा ही मोठी गावे १०० टक्के बंद होती़ नवापुर शहरातील नागरिकांनी घरात राहणे पसंत केल्याने पहाटेपासून शहरात शुकशुकाट होता़ बसेस बंद असल्याने वाहतूक बंद होती़ गुजरात सिमेवरील बेडकी तपासणी नाक्यावर गुजरातमधून येणाºया सर्व वाहनांची काटेकोरपणे तपासणी सुरु असल्याने महामार्गावरही शुकशुकाट होता़सातपुड्याच्या दुर्गम भागात शुकशुकाटसपाटीच्या तालुक्यांसह सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव, तोरणमाळ, मोलगी या गावांमध्ये प्रथमच पूर्णपणे बंद करण्यात आला़ आजवरच्या इतिहासात प्रथमच ही गावे बंद झाल्याचे सांगण्यात येत होते़ यात मोलगी येथील बाजार नियमित भरत असल्याने याठिकाणी नागरिकांची कायम असते़ परंतू रविवारी पूर्णपणे शुकशुकाट असल्याचे दिसून आले़