साने गुरुजी विद्याश्रममध्ये छायाचित्र प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:04 IST2020-03-06T12:04:43+5:302020-03-06T12:04:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या विद्याश्रम परिवारातील विद्यार्थ्यांसाठी ‘आर्टिफेस्ट २०२०’ अंतर्गत छायाचित्र स्पर्धेतील ...

Photo exhibition at Sane Guruji Vidyasharm | साने गुरुजी विद्याश्रममध्ये छायाचित्र प्रदर्शन

साने गुरुजी विद्याश्रममध्ये छायाचित्र प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या विद्याश्रम परिवारातील विद्यार्थ्यांसाठी ‘आर्टिफेस्ट २०२०’ अंतर्गत छायाचित्र स्पर्धेतील छायाचित्रांचे प्रदर्शन येथे भरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून राष्टÑीय किर्तीच छायाचित्रकार अशोक पाटील (पुणे), माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, राजेंद्र जव्हेरी, किशन चौधरी, मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्यासह विविध ज्ञानशाखांचे प्राचार्य उपस्थित होते.
अशोक पाटील म्हणाले की, छायाचित्रण व चित्रकलेसाठी सातपुड्याच्या पायथ्याशी मोठी संधी आहे. नाविन्यता व सृजनशिलता येथील नव्या पिढीत मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कलेला संधी प्राप्त होऊ शकते. खान्देशात विशेषत: सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पुरातन वास्तूंचे जतन होणे आवश्यक आहे. अनेक शब्द बोलण्यापेक्षा एक चित्र मोठे काम करत असून चित्रकला व छायाचित्रणास याठिकाणी कलादालन उभारून संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. दीपक पाटील म्हणाले की, छायाचित्र व चित्रकलेकडे पाहण्यासाठी योग्य दृष्टी आणि दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. यशस्वी चित्रकार होण्यासाठी कठोर परिश्रम घेणे युवा चित्रकारांना प्रेरणादायी ठरणारे असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा.दिलीप सूर्यवंशी यांनी केले.


छायाचित्र स्पर्धेचे परीक्षण शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार अशोक वडनेरे व संजय पाटील यांनी केले. छायाचित्रण स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा या वेळी सन्मान करण्यात आला. त्यात प्रथम सुरभी प्रदीप पाटील (सातपुडा विद्यालय), द्वितीय हर्षल पवार (औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय), तृतीय दर्शन भालेराव (कृषी महाविद्यालय) व उत्तेजनार्थ नीलेश सोनवणे (अभियांत्रिकी महाविद्यालय) यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Photo exhibition at Sane Guruji Vidyasharm