शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारपेक्षा गुजरातमध्ये दहा रुपयांनी पेट्रोल स्वस्त, दुचाकीधारकांची गुजरातमध्ये धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST

नंदुरबार : नंदुरबारातील पेट्रोलच्या भावापेक्षा लगतच्या १६ कि.मी. अंतरावरील निझर (गुजरात)येथील पेट्रोलचा भाव दहा रुपयांनी कमी असल्यामुळे नंदुरबारसह परिसरातील ...

नंदुरबार : नंदुरबारातील पेट्रोलच्या भावापेक्षा लगतच्या १६ कि.मी. अंतरावरील निझर (गुजरात)येथील पेट्रोलचा भाव दहा रुपयांनी कमी असल्यामुळे नंदुरबारसह परिसरातील वाहनधारकांचा पेट्रोल भरण्यासाठीचा मोर्चा निझरकडे वळत आहे. डिझेलच्या भावात मात्र केवळ ४७ पैशांचा फरक आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलच्या भावाने शंभरी गाठण्याची तयारी केली आहे. नंदुरबारात सोमवार, २२ रोजी पेट्रोलचा भाव ९७.८६ रुपये लीटर इतका होता तर डिझेलचा भाव ८७.५७ रुपये लीटर इतका होता. इंधनाच्या वाढत्या भावामुळे सामान्य नागरिकांचा आर्थिक बजेट कोलमडत आहे. दुसरीकडे लगतच्या गुजरातमध्ये मात्र पेट्रोलच्या भावात तब्बल पाच रुपयांची तफावत आहे. नंदुरबारपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या निझर येथील पेट्रोलपंपावर पेट्रोलचा भाव ८७.६७ रुपये लीटर इतका आहे. नंदुरबारपेक्षा तेथील भावात १० रुपये १९ पैशांची तफावत आहे. तर गुजरातमध्ये डिझेलचा भाव ८७.१० रुपये लीटर आहे. नंदुरबारपेक्षा तेथील डिझेलचा भावात फारसा फरक नाही. केवळ ४७ पैशांनी डिझेल स्वस्त आहे.

गुजरात सिमेलगत असलेल्या नंदुरबार, नवापूर, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक दुचाकीधारक गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी धाव घेत आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून निझर, उच्छल, सोनगड, कुकरमुंडा येथील पंपांवरील पेट्रोलची विक्री २५ टक्केपेक्षा अधिक वाढली असल्याचे तेथील चालकांनी सांगितले.