नेमवार हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:22+5:302021-07-09T04:20:22+5:30

निवेदनात, नेमवार येथील सुरेंद्र चौहान आणि त्याच्या अन्य साथीदारांनी आदिवासी समुदायातील पवन, पूजा, दिव्या, रूपाली व त्यांची आई ममताबाई ...

The perpetrators of the genocide should be sentenced to death | नेमवार हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी

नेमवार हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी

निवेदनात, नेमवार येथील सुरेंद्र चौहान आणि त्याच्या अन्य साथीदारांनी आदिवासी समुदायातील पवन, पूजा, दिव्या, रूपाली व त्यांची आई ममताबाई यांची निर्घृणपणे हत्या करून त्यांच्या मृतदेहांना खड्ड्यात पुरले होते. ४७ दिवसांपासून हे संपूर्ण कुटुंब गायब असल्यामुळे तेथील स्थानिक आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरेंद्र चाैहानवर शंका उपस्थित केली. तरीही नेमवार पोलिसांकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, ही घटना एक सामूहिक हत्याकांड असल्यामुळे आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला आहे. त्या घटनेची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. दरम्यान, घटनेला दाबून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. या घटनेला ४७ दिवस दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरही कठोर कार्यवाही करण्यात यावी. पोलीस अधिकाऱ्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, पीडित परिवारातील सदस्यांना शासकीय नोकरीसोबत एक कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर ॲड. अभिजित वसावे, राजू पावरा, प्रवीण पावरा, ॲड. छोटू वळवी, वसंत वळवी, शैलेश पावरा, बापू पावरा यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Web Title: The perpetrators of the genocide should be sentenced to death