शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाळण्यांना नाकारली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नवरात्रोत्सवनिमित्त शहाद्यातील प्रेस मारुती मंदिरासमोरील मैदानावर यात्रा सुरू आहे. परंतु अतिवृष्टीमुळे त्या जागेवर अधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नवरात्रोत्सवनिमित्त शहाद्यातील प्रेस मारुती मंदिरासमोरील मैदानावर यात्रा सुरू आहे. परंतु अतिवृष्टीमुळे त्या जागेवर अधिक काळ पाणी साचल्याने ती जागा पाणथळ तथा ओलसर झाली असून तेथे मोठी पाळणे उभारणे धोक्याचे ठरते. त्यासाठी मोठय़ा  पाळण्यास पालिकेने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे काही व्यावसायिकांसाठी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असले तरी भाविकांच्या दृष्टीने पालिकेचा निर्णय योग्यही ठरत आहे. या वर्षी शहादा शहर व परिसरात वरूणराजाने चांगलीच कृपादृष्टी ठेवली आहे. अनेक वर्षापेक्षा यंदा पावसाने उच्चांक गाठला असून अजुनही पाऊस सुरुच आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील प्रेस मारुती मंदिरासमोरील पालिकेच्या नियोजित ट्रक टर्मिनल जागेवर  पाणी साचल्याने आजही ही जागा चिखलाने भरलेली आहे. ओलसरपणामुळे तेथे मोठ-मोठी पाळणे उभारणे हे भाविकांसाठी धोक्याची ठरत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनामार्फत पालख्या व पाळणे उभारण्यास परवानगी नाकरण्यात आली आहे. नवरात्रोत्सव सुरु होताच पाळणा व्यावसायिकांना व्यवसायाची संधी मिळते, पर्यायाने उदरनिर्वाहाचे साधनच उपलब्ध होत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहाद्यात दोंडाईचा रोडवरील प्रेस मारुती मैदानावर यात्रा भरविण्यात येत आहे. या यात्रेत मोठ-मोठी पाळणे व अन्य व्यावसायिक दाखल झाले आहेत. नेहमीप्रमाणे यंदाही या यात्रेत आर्थिक उलाढालही होत असल्याने बाहेरुन येणा:या बहुतांश व्यवसायिकांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध झाले आहेत. परंतु अनेक दिवसांपासून पाणी साचल्यामुळे तेथील जागा पाणथळ बनली असून आजही काही प्रमाणात तेथे पाणी साचलेलेच आहे. त्यामुळे मोठय़ा पाळण्यांसाठी ती जागा अयोग्यच ठरत आहे. शिवाय चिखलाचे प्रमाण अधिक असल्याने ऐन गर्दीच्या वेळेस अपघाताची शक्यता नाकारताही येत नाही. हे लक्षात घेत संभाव्य अपघात टाळण्यासाठी पाळणे उभारण्यासाठी व्यावसायिकांना परवानगी नाकारण्यात आल्याचे पालिका प्रशासनामार्फत म्हटले जात आहे.