अपघातास कारणीभूत दुचाकी चालकास दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 12:58 IST2020-02-16T12:58:14+5:302020-02-16T12:58:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुुरबार : दुचाकी अपघातात एक जण ठार तर एकजण जखमी झाल्याच्या घटनेस जबाबदार दुचाकी चालकास नंदुरबार ...

Penalty for two-wheeler driver causing accident | अपघातास कारणीभूत दुचाकी चालकास दंड

अपघातास कारणीभूत दुचाकी चालकास दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुुरबार : दुचाकी अपघातात एक जण ठार तर एकजण जखमी झाल्याच्या घटनेस जबाबदार दुचाकी चालकास नंदुरबार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
किशोर तुकाराम वळवी असे शिक्षा झालेल्या चालकाचे नाव आहे. एप्रिल २०१४ रोजी ही घटना इसाईनगरनजीक घडली होती. या अपघातात पंडित वसावे हे उपचार घेतांना मरण पावले होते तर अंजलीबाई या जखमी झाल्या होत्या. प्रथमवर्ग न्यायालयात खटला चालला. न्या.निलेश पाटील यांनी किशोर वळवी यास एका गुन्ह्यात चार हजार तर दुसऱ्या गुन्ह्यात सहा महिने साधा कारावास व हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. हवालदार केशव गावीत यांनी दोषारोप पत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे एस.व्ही.पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी पी.कोकणी होते.

Web Title: Penalty for two-wheeler driver causing accident