शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा काढण्याकडे शेतकरी वर्गाने फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

ब्राह्मणपुरी : गेल्या खरीप हंगामात पिकांचे संरक्षण करण्यासाठी तालुक्यातील हजारावर शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातील काही मोजक्याच शेतकऱ्यांना ...

ब्राह्मणपुरी : गेल्या खरीप हंगामात पिकांचे संरक्षण करण्यासाठी तालुक्यातील हजारावर शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातील काही मोजक्याच शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेची मदत मिळाली. तर उर्वरित शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी विमा उतरवण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या खरीप हंगामात परतीच्या अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांना फटका बसला.

सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले. तर शेतकऱ्यांच्या घरात येईल, अशी अपेक्षा असताना पुन्हा पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेचे कवच असल्याने शेतकऱ्यांना विमा मिळण्याची अपेक्षा होती.

त्यातून काही प्रमाणात का होईना, यावर्षीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना थोडा आधार मिळाला असता, मात्र या ठिकाणीही शेतकऱ्यांची निराशा झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाला विमा कंपन्यांनी पाने पुसण्याचे काम केले. विमा कंपन्यांनी ऐनवेळी शेतकरी वर्गाला काही अटी व नियम लावत वगळले व स्वतःचा कोटींचा लाभ करून घेतला. त्यामुळे यंदा शेतकरी वर्गाने पीकविमा उतरवण्याकडे पाठ फिरवली असल्याचे यावर्षी विमा न काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येवरून दिसून येते.

विमा लाभापासून शेकडो शेतकरी वंचित

गतवर्षी शेतकऱ्यांनी पिकाचा काढण्यात आलेल्या विमा रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी याकडे पाठ फिरविल्याचे शेतकरी बोलत आहेत. तर गत वर्षाचे शेकडो जण वंचित आहेत.

पीक कापणीच्या प्रयोगाच्या उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार भरपाई

संबंधित पीक विमा कंपनीला विचारणा केली असता त्यांच्याकडून पीक कापणी प्रयोगाच्या उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार आपल्या महसूल मंडळाला पीक विमा लागू झालेला नाही असे उत्तर देण्यात येत असते. जर पीक कापणीच्या प्रयोगाच्या उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार मंडळाच्या पीक विमा लागू होत नसेल तर पैसे उकडण्यासाठी पीक विमा काढायला लावता का? असा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून होत आहे.