शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दंड भरू, पण बाहेर फिरू ; विनाकारण फिरणाण्या २ हजार बेशिस्तांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

नंदुरबार : लाॅकडाऊन असतानाही शहरात भटकंती करणाऱ्यांवर पोलीस दलाकडून कारवाई केली जात आहे. यातून या बेशिस्तांच्या रॅपिड अँटिजेन चाचण्या ...

नंदुरबार : लाॅकडाऊन असतानाही शहरात भटकंती करणाऱ्यांवर पोलीस दलाकडून कारवाई केली जात आहे. यातून या बेशिस्तांच्या रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्याची मोहीम राज्यभर हाती घेतली गेली होती. नंदुरबार जिल्ह्यातही ही मोहीम काही काळापुरती राबवली गेली होती. यातून दोन हजार बेशिस्तांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नंदुरबार व शहादा या दोन ठिकाणी बेशिस्तांची रॅपिड टेस्ट करण्याचा उपक्रम राबवला होता. यांतर्गत रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासाठी आरोग्य पथकांना सोबत घेण्यात आले होते. यातून विनाकारण भटकणा-या सुमारे १०० जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले होते. या सर्वांना तातडीने त्या-त्या कोविड केअर सेंटर्समध्ये दाखल करण्यात आले होते. रॅपिड टेस्ट झाल्यानंतर नियमानुसार बेशिस्तांवर कारवाई करून दंड करण्यात आला होता. तूर्तास हा उपक्रम आरोग्य पथक नसल्याने बंद करण्यात आला आहे. येत्या काळात आरोग्य पथक आल्यास हा उपक्रम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

कारणे जुनीच

दरम्यान पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या बहुतांश बेशिस्तांकडून दवाखान्यात जात असल्याचे कारण दिले जात होते. यातून त्यांची पथकांकडून तपासणी करून घेत दंड केला जात होता. काहींकडून अर्जंट मेडिकलमध्ये जाणे, खाद्यपदार्थांची आवश्यकता असेही बहाणे करण्यात आले होते.

जिल्हा पोलीस अधिक्षक मंहेद्र पंडित यांनी शहादा व नंदुरबार या दोन पोलीस ठाणे हद्दीत हा उपक्रम राबवला होता. यावेळी बेशिस्तांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले होते. अनेक जण यामुळे घराबाहेर पडणे टाळत असल्याची माहिती देण्यात आली. इतर पोलीस ठाण्यांमध्ये येत्या काळात हा उपक्रम राबवला जाण्याची शक्यता आहे.

शहादा व नंदुरबार येथे तपासणी