शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

पावणे पाच लाखाचे मोबाईल केले हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  मोबाईल दुरूस्ती व विक्रीच्या दुकानातून पावणेपाच लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  मोबाईल दुरूस्ती व विक्रीच्या दुकानातून पावणेपाच लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीस गेलेले सर्वच मोबाईल जप्त करण्यात आले आहे. एलसीबीने ही कारवाई केली. नंदुरबारातील नवशक्ती कॅाम्पलेक्समधील दुकानातून ३ डिसेंबर रोजी तब्बल ३४ मोबाईल चोरीस गेले होते. एलसीबीने तपास करून ५ डिसेंबर रोजी एका महिलेसह व्यक्तीला अटक केली होती. त्यांच्याकडून सात मोबाईल जप्त करण्यात आले होते. परंतु मुख्यसूत्रधार हाती लागत नव्हते. पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यावरून गिरिविहार भागातील दोन बालकांना ताब्यात घेतले.  त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. शिवाय मोबाईल लपविलेली एमएल टाऊनमागील पडीत जागा दाखविली. तेथे बाभळीच्या झाडाखाली खड्डा खोदून बॅगेत लपविलेेले तब्बल ५६ मोबाईल काढून दिले. त्या मोबाईलची किंमत चार लाख ७० हजार रुपये इतकी आहे. दोघा अल्पवयीन बालकांना शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक  गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक विजयसिंग राजपूत, हवालदार प्रमोद सोनवणे, राकेश मोरे, दादाभाई मासुळ, पुष्पलता जाधव, आनंदा मराठे,        अभय राजपूत यांच्या पथकाने केली. चोरीचा संपुर्ण माल हस्तगत केल्याने पथकाचे पोलीस अधीक्षकांनी कौतूक केले.