पंचायत समित्यांना शेष फंडाच्या निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST2021-07-27T04:32:06+5:302021-07-27T04:32:06+5:30

तळोदा पंचायत समितीच्या ६९ लाखाचा प्रस्ताव तळोदा पंचायत समितीने गेल्या जानेवारी,फेब्रुवारीमध्ये शेष फंडाच्या निधीसाठी साधारण ६९ लाखांचा प्रस्ताव जिल्हा ...

Panchayat Samiti awaits funds of remaining funds | पंचायत समित्यांना शेष फंडाच्या निधीची प्रतीक्षा

पंचायत समित्यांना शेष फंडाच्या निधीची प्रतीक्षा

तळोदा पंचायत समितीच्या ६९ लाखाचा प्रस्ताव

तळोदा पंचायत समितीने गेल्या जानेवारी,फेब्रुवारीमध्ये शेष फंडाच्या निधीसाठी साधारण ६९ लाखांचा प्रस्ताव जिल्हा परिषद मार्फत जिल्हा प्रशासना कडे पाठवला आहे.त्यासाठी पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.अजूनही त्यांना दाद मिळत नसल्याचे पदाधिकारी सांगतात.या बाबत सबंधित पदाधिकारी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगितले जात आहे.तळोदा पंचायत समिती बरोबरच इतर पंचायत समितीनी देखील जाने वारी,फेब्रुवारी मध्ये च प्रस्ताव दिला आहे.साधारण पाच कोटी रुपयांच्या प्रस्ताव दाखल केल्याचे म्हटले जात आहे.

येथील पंचायत समिती प्रशासनाकडून शेष फंडाची माहिती घेतली असता अजूनही आला नसल्याचे सांगण्यात आले आहे.गेल्या वर्षी २९ लाख रुपये प्राप्त झाले होते. तेही कोविड च्या कालावधीत मिळाले होते.

Web Title: Panchayat Samiti awaits funds of remaining funds