जिल्ह्यातून ९९ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:59 PM2020-08-12T12:59:28+5:302020-08-12T12:59:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाच्या आदेशाने राज्यातील सुमारे पावणे चार हजार जिल्हा परिषद शिक्षकांचा स्वगृही परतण्याचा मार्ग ...

Order for transfer of 99 teachers from the district | जिल्ह्यातून ९९ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश

जिल्ह्यातून ९९ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य शासनाच्या आदेशाने राज्यातील सुमारे पावणे चार हजार जिल्हा परिषद शिक्षकांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने यंदाची आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली असून जिल्हा परिषद स्तरावर शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ यात नंदुरबार जिल्ह्यातून ९९ शिक्षक परजिल्ह्यात तर १२५ शिक्षक बदलून येत आहेत़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत संभ्रम होता़ मात्र, शासनाने शिक्षक बदल्यांसाठी विशेष समिती स्थापन करून नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांना बदली समन्वय समिती प्रमुखपदी नियुक्त केले होते. १० आॅगस्टपूर्वी राज्यातील सर्व शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आॅनलाइन व जिल्हाअंतर्गत बदल्या आॅफलाईन करण्याबाबत समितीला अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार गेली अनेक वर्षे स्वत:च्या गावापासून व परिवारापासून लांबवर नोकरी करणाऱ्या शिक्षकांची सुविधा व्हावी, यादृष्टीने बदली समन्वय समितीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया हाती घेऊन राज्यातील ३ हजार ७८० शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपूर्वी शासनाने शिक्षकांच्या आॅनलाईन व आॅफलाईन बदल्यांबाबत आदेश जारी केले होते.
दरम्यान बदल्यांबाबत राज्य समन्वयक विनय गौडा यांनी सांगितले की, राज्यातील मराठी व उर्दू माध्यमाच्या एकूण १२ हजार ४९० शिक्षकांनी स्वजिल्ह्यात बदली करून देण्याचे विनंती अर्ज केले आहेत. आॅनलाइन पद्धतीने केलेल्या या अर्जांची छाननी करून प्रत्येक जिल्हास्तरावर बिंदुनामावलीनुसार रिक्त जागा, बदलीनंतर १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त राहू नयेत याची काळजी घेत याद्या तयार करून ज्या ठिकाणी शिक्षकांना सामावून घेणे शक्य आहे़ त्या ठिकाणी संबंधित शिक्षकांच्या बदली अर्जाच्या प्राधान्यक्रमानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्य शासन निर्णयानुसार या बदल्या करण्यात आल्या असून, या धोरणावर अनेक शिक्षक व शिक्षक संघटनांनी बदल सुचविले आहेत. बदलीबाबत अभ्यासगटाने त्याबाबत शासनाला अहवाल सादर केलेला असून, पुढील बदल्या शासन धोरणात योग्य ते बदल करून केल्या जातील, अशी अपेक्षा आहे. प्रत्येकाला संवर्गनिहाय जागेच्या उपलब्धतेनुसार आपापल्या जिल्ह्यात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशी महितीही राज्य समन्वयक विनय गौडा यांच्याकडून देण्यात आली आहे, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये १८९० शिक्षक हे बदलीने जाणार असल्याने त्यांच्याकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येऊन आनंद व्यक्त करण्यात येत होता़

४नंदुरबार जिल्ह्यातून ९९ शिक्षक परजिल्ह्यात बदली करून जात असून, १२५ शिक्षक नंदुरबार जिल्ह्यात बदलीने येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक २७ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत़ यवतमाळ १९, धुळे १३, परभणी १२, जालना ५ तर बुलढाणा, नाशिक व सातारा जिल्ह्यात प्रत्येकी ४, गडचिरोली२ तर वर्धा, ठाणे, सोलापूर, पालघर, रायगड, जळगाव व चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी एका शिक्षकाची बदली झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक ४७ शिक्षक, रायगड २०, धुळे १४, सांगली ११, नाशिक ९, औरंगाबाद व कोल्हापूर प्रत्येकी ५, सातारा व अहमदनगर प्रत्येकी ३, बीड २ तर पालघर, सोलापूर व यवतमाळ जिल्ह्यातून प्रत्येकी एक शिक्षक बदलीने येत आहेत.

Web Title: Order for transfer of 99 teachers from the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.