पालिका सभेत जमीन आरक्षणाच्या विषयावर विरोधकांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:25 PM2020-05-22T12:25:31+5:302020-05-22T12:25:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पालिका कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा कवच, पाणी पट्टी व घरपट्टी सुट देणे, ...

Opposition's objection on the issue of land reservation in the municipal meeting | पालिका सभेत जमीन आरक्षणाच्या विषयावर विरोधकांचा आक्षेप

पालिका सभेत जमीन आरक्षणाच्या विषयावर विरोधकांचा आक्षेप

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पालिका कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा कवच, पाणी पट्टी व घरपट्टी सुट देणे, फवारणीसाठी यंत्रणा खरेदी करणे यासह इतर विषय पालिका सभेत विरोधकांनी लावून धरले. दरम्यान, बहुमताने अजेंड्यावरील नऊ विषय मंजुर करण्यात आले.
पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी अध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे कारण देत केवळ सदस्यांना आणि मोजक्याच अधिकाऱ्यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला होता. अजेंड्यावर एकुण नऊ विषय होते. ते सर्व बहुमताने मंजुर करण्यात आले.
बैठकीत विरोधकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पालिका कर्मचाºयांना ५० लाख रुपयांचे विमा कवच मिळावे अशी मागणी केली. पालिकेकडे जंतूनाशक फवारणीचे वाहने व उपकरणे कमी आहेत. ग्रामिण भागातून भाड्याने घेवून शहरात फवारणी करावी लागत असते. त्यामुळे त्यांची खरेदी करणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक सामान्य नागरिक पाणी पट्टी भरू शकले नाही. अशा लोकांचे नळ कनेक्शन कट करण्याचे काम पालिकेकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेते चारूदत्त कळवणकर व सदस्यांनी केला.
बैठकीत पालिकेच्या मालकिचे सर्व्हे नंबर ५७१ पैकी ४३३ मधील जागेवरील दुकान संकुलास लिफ्ट बसविण्यास मंजुरी देण्यात आली. शहर मंजुर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक ११७ पोलीस परेड ग्राऊंड करीता आरक्षीत जागेसंदर्भातील जमीन मालकाच्या सुचनेवर चर्चा करण्यात आली. याशिवाय इतरही सहा विषयांवर चर्चा करून ठराव मंजुर करण्यात आले. बैठकीला सर्व विषय समिती सभापती व सदस्य उपस्थित होते.


 

Web Title: Opposition's objection on the issue of land reservation in the municipal meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.