शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

३० गावांचा संपर्क असलेल्या प्रकाशा गावात केवळ शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : दक्षिण काशी म्हणून संपूर्ण देशात लौकिक असलेल्या प्रकाशा ता़ शहादा येथे लॉकडाऊनमुळे जनजीवनावर मोठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : दक्षिण काशी म्हणून संपूर्ण देशात लौकिक असलेल्या प्रकाशा ता़ शहादा येथे लॉकडाऊनमुळे जनजीवनावर मोठा परिणाम जाणवत आहे़ परंतू आरोग्य अबाधित ठेवून कोरोना हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थ घरात राहणे पसंत करत आहेत़ यामुळे गावात केवळ शांतता असून ३० गावांचा संपर्क असलेली बाजारपेठ बंद असल्याने आर्थिक घडीही विस्कटली आहे़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या जनता कर्फ्यूत येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता़ त्यानंतर सोमवारी सर्व काही सुरळीत होण्याची अपेक्षा असताना राज्यसरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती़ ग्रामीण भागासाठी हे बंधनकारक नसले तरीही त्यात नागरिकांनी सहभाग घेतला़ पंतप्रधान मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून मात्र गावात पूर्णपणे शुकशुकाट आहे़ प्रकाशा पोलीस दूरक्षेत्र आणि ग्रामपंचायत पदाधिकारी व सफाई कामगार यांच्यासह केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचा येथे दैनंदिन वावर आहे़ बºहाणपूर-अंकलेश्वर आणि सेंधवा-विसरवाडी या दोन महामार्गांवरचे प्रमुख गाव असल्याने गावातील तसेच चौफुलीवरचे सर्व हॉटेल्स गेल्या चार दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत़ यामुळे बसस्थानक, गावातील गांधी चौक, गढी परिसर यासह केदारेश्वर मंदिर परिसरातही लॉकडाऊन आहे़ मंदिराच्या परिसरात राहणारे किरकोळ व्यावसायिकांची दुकानेही गेल्या चार दिवसात उघडलेली नाहीत़ मंदिरे बंद असल्याने भाविकच येत नसल्याने येथे वास्तव्य करणाºया व्यावसायिकांनीही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ गावातील विविध भागात दररोज सायंकाळी बसणारे नागरिकही दिसून येत नसल्याने जागोजागी ठेवण्यात आलेले बाकही रिकामे आहेत़ ग्रामपंचायतीकडून गावात दोन वेळेस औषध फवारणी आणि स्वच्छता करण्यात येत आहेग़ावातील ९० टक्के नागरिक हे घरीच राहणे पसंत करत असून १० टक्के नागरिकच केवळ गरजेच्या वस्तू घेण्यासाठी बाहेर पडत आहे़ महामार्गाच्या दुसºया बाजूला वैजाली रोड परिसरातील रहिवासी वसाहतीतही शुकशुकाट आहे़प्रकाशा येथील आठवडे बाजाराला १०० वर्षांपेक्षा अधिकची परंपरा आहे़ दर बुधवारी भरणारा हा आठवडे बाजार प्रथमच बंद पडला आहे़ येत्या बुधवारीही हा बाजार भरणार नसल्याने तळोदा आणि शहादा तालुक्यातील ३० गावांच्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे़४गावात सध्या केवळ दूध, मेडीकल दुकाने, भाजीपाला, बँक, ग्रामपंचायत आणि महसूल विभागाचे कर्मचारी दिसून येत आहेत़शेतशिवारात जाण्यास मजूरही धजावत नसल्याने शेतकऱ्यांची कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत़ बहुतांश शेतकºयांनी स्वेच्छेने शेतीकामांना थांबा दिला आहे़ विशेष म्हणजे काही शेतकºयांनी मजूरांची आबाळ होवू नये म्हणून त्यांना आगाऊ रोजगार देत त्यांची सोय करुन दिली आहे़दरम्यान प्रकाशा येथील ग्रामपंचायतीने कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी ग्रामस्थांना मास्क वाटप केले. किराणा दुकानावर गर्दी होऊ नये यासाठी ग्राहकांमध्ये तीन फुटाचे अंतर त्यांनी ठरवून दिले आहे. गावांमध्ये रिक्षा फिरवून जनजागृती करण्यात आली होती. ग्रामपंचायतीने दीड हजार मास्क ग्रामस्थांना वाटप केले. कोरोना सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, गटविकास अधिकारी सी़टीग़ोसावी, ग्रामसेवक बी.जी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण भिल, रफिक खाटीक, विस्तार अधिकारी भरत निकुंभे उपस्थित होते़प्रकाशा गावातील सर्वाधिक प्रसिद्ध असा मासळी बाजार आणि बॅरेजमधील मासेमारी बंद असल्याने मच्छीमारही घरीच बसून आहेत़