शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभर चालतात केवळ १५ रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उधना-जळगाव मार्गावरचे प्रमुख स्थानक असलेल्या नंदुरबार रेल्वेस्थानकातून लाॅकडाऊनपूर्वी ३२ प्रवासी गाड्या सुरू होत्या. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उधना-जळगाव मार्गावरचे प्रमुख स्थानक असलेल्या नंदुरबार रेल्वेस्थानकातून लाॅकडाऊनपूर्वी ३२ प्रवासी गाड्या सुरू होत्या. या गाड्या गेल्या सात महिन्यांपासून बंद असून सध्या आठवडाभरात केवळ १५ रेल्वे गाड्या धावत आहेत.  
कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर पूर्वपदावर येत असलेल्या प्रवासी वाहतूक व्यवस्थेत रेल्वे अग्रक्रमावर आहे. यातून सात महिन्यांपासून प्रमुख रेल्वेगाड्या बंद असल्याने गुजरातमध्ये जाणारे तसेच गुजरातमधून येणार्यांना अडचणी येत आहेत. यावर मार्ग म्हणून रेल्वेकडून येत्या २५ पासून आणखी दोन गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पॅसेंजर गाड्यांबाबत अद्याप निर्णय नसला तरी दिवाळीनंतर सुरत-भुसावळ पॅसेंजर गाड्या सुरू होतील अशी शक्यता रेल्वेतील सूत्रांनी वर्तवली आहे. 
दरम्यान गुरुवारी नंदुरबार रेल्वेस्थानकात रेल्वेचे डीआरएम जी.व्ही.एल.सत्यकुमार यांनी भेट देत माहिती घेतली. यावेळी रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाची त्यांनी पाहणी करुन अधिकार्यांसोबत संवाद साधला. यावेळी खासदार डाॅ. हीना गावीत यांनीही त्यांची भेटी घेतली. खासदार डाॅ. गावीत यांनी रेल्वेगाड्या वाढीसह प्रवाशी वाढीसाठी करण्यात येणार्या उपाययोजनांवर चर्चा केल्याची माहिती देण्यात आली आहे. रेल्वेस्थानकातील विविध सोयी सुविधांचा डीआएम सत्यकुमार यांनी आढावा घेतला. 
नंदुरबार रेल्वेस्थानकातून सध्या अहमदाबाद-हावडा, मुजफ्फरपूर-अहमदाबाद, गोरखपूर-अहमदाबाद आणि छपरा-सुरत या चार गाड्या दररोज सुरू आहेत. या व्यतिरिक्त कोरोना रुग्ण तसेच आपात्कालीन स्थितीसाठी सुरू करण्यात आलेल्या ११ गाड्या चालवण्यात येत आहेत. यात हावडा कोविड एक्सप्रेस, गांधीधाम-खुर्दा रोड, द्वारका कोविड एक्सप्रेस यासह इतर गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांमधून प्रवास करत नंदुरबार स्थानकात येणार्या प्रवाशांची आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांकडून तपासणी करण्यात येत आहे. गेल्या सात महिन्यात बंद असलेल्या रेल्वेगाड्यांमुळे नंदुरबार रेल्वेस्थानकातून प्रवासी भाड्याचे २० कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. गाड्या सुरू झाल्यानंतर अवलंबून असलेले उद्योगही पुन्हा सुरू होवून कामगारांना रोजगार मिळणार आहे.