ऑनलाईन पावतीमुळे वाहनचालकांकडील दंडाच्या वसुलीवर होतोय परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:30+5:302021-07-09T04:20:30+5:30

नंदुरबार : ऑनलाईन दंडाची पावती दिली जात असल्याने अनेकजण दंडाची रक्कम भरण्यास उशीर करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, यावर्षी ...

Online receipts are affecting the recovery of fines from motorists | ऑनलाईन पावतीमुळे वाहनचालकांकडील दंडाच्या वसुलीवर होतोय परिणाम

ऑनलाईन पावतीमुळे वाहनचालकांकडील दंडाच्या वसुलीवर होतोय परिणाम

नंदुरबार : ऑनलाईन दंडाची पावती दिली जात असल्याने अनेकजण दंडाची रक्कम भरण्यास उशीर करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, यावर्षी अर्थात जानेवारी ते जूनदरम्यान तब्बल १५ हजारजणांनी जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून तब्बल सात लाख ४८ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्यातील ४० टक्के दंडाची रक्कम संबधितांकडे बाकी असल्याचे समजते.

नियम तोडल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागते. यासाठी वाहतूक पोलीस वाहनधारकांना नियम समजावून सांगून, प्रसंगी दंड आकारूनदेखील त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. सध्या दंडाच्या पावतीसह ऑनलाईन दंडाची पावतीदेखील दिली जात असते. ऑनलाईन पावतीमुळे अनेकजण दंडाची रक्कम भरण्यास उशीर करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहन जप्तीची कारवाईदेखील केली जात आहे.

Web Title: Online receipts are affecting the recovery of fines from motorists