शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाची ऑनलाइन बुकिंग होते १५ सेकंदांत फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

कोरोना लसीकरणासाठी कोविन व आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केल्यानंतर नोंदणी करायची आहे. वरील ठिकाणी रजिस्ट्रेशन सहजरीत्या होते. मात्र, ...

कोरोना लसीकरणासाठी कोविन व आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केल्यानंतर नोंदणी करायची आहे. वरील ठिकाणी रजिस्ट्रेशन सहजरीत्या होते. मात्र, शेड्युल टाइम स्लॉटसाठी ऑनलाइन नोंदणी करून कन्फर्मेशन मिळविण्यासाठी या वयोगटातील नागरिकांना कमालीचे कष्ट घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्यापासून अवघ्या १५ सेकंदांत दररोज २५० बुकिंग फुल्ल होत असल्याने, या वयोगटातील नागरिक हतबल झाले आहेत.

शहादा शहर व तालुक्यासाठी केवळ शहरातील नागरी आरोग्य प्राथमिक केंद्र या एकमेव ठिकाणी १८ ते ४४ या वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण केले जाते, तर ४५ व त्यापुढील वयोगटांतील नागरिकांसाठी या केंद्रासह तालुक्यात १६ ठिकाणी लसीकरणाची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. १८ ते ४४ या वयोगटांसाठी केवळ एकमेव केंद्र लसीकरणासाठी उपलब्ध असल्याने नोंदणी व बुकिंग कन्फर्म असलेल्या नागरिकांचे येथे लसीकरण केले जात आहे. ज्यांची नोंदणी नाही, बुकिंग कन्फर्मेशन नाही, अशांचे लसीकरण येथे होत नाही. परिणामी, एकाच ठिकाणी लसीकरण होत असल्याने, दररोज सायंकाळी शहरासह तालुक्यातील किमान एक लाख नागरिक सायंकाळी पाच ते सहा या कालावधीत बुकिंगसाठी मोबाइल घेऊन बसत आहेत. मात्र, तीस सेकंदात दररोज २५० बुकिंग फुल्ल होत असल्याने, नागरिकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे.

१८ ते ४४ या वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणासाठी शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी सुविधा करण्यात आली आहे. शासनाकडून ज्या प्रमाणात लसीची उपलब्धता होत आहे, त्यानुसार दररोज लसीकरण केले जात आहे. येत्या काळात लसीची उपलब्धता वाढणार असून, त्यानुसार शहर व तालुक्यात लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात येईल. ४५ वर्षे व त्यावरील वयोगटांसाठी मुबलक प्रमाणात लस उपलब्ध असून, ज्या नागरिकांचा एक डोस पूर्ण झाला असून, दुसऱ्या डोसची आवश्यकता आहे, अशांना प्राधान्य दिले जाईल.

-डॉ.चेतन गिरासे, प्रांताधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर, शहादा