शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार स्थलांतरीत मजूर परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 14:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे गुजरातमध्ये अडकून पडलेले सुमारे एक हजारापेक्षा अधिक मजूर मंगळवारी अचानक महाराष्टÑाच्या सीमेवर येऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे गुजरातमध्ये अडकून पडलेले सुमारे एक हजारापेक्षा अधिक मजूर मंगळवारी अचानक महाराष्टÑाच्या सीमेवर येऊन धडकल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. या मजुरांना महाराष्टÑात प्रवेश द्यावा की नाही याबाबत महाराष्टÑ आणि गुजरात या दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये चार तास खल चालल्यानंतर सरकारच्या आदेशान्वये अखेर मजुरांना जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश मिळाला. दरम्यान, या सर्व मजुरांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी २५ हजारापेक्षा अधिक मजूर गुजरातमध्ये रोजगारासाठी हंगामी स्थलांतरीत होतात. हे मजूर साधारणत: सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात जातात व मार्चनंतर टप्प्याटप्प्याने आपल्या गावी परततात. यावर्षी कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवल्याने हे मजूर गुजरातमध्येच अडकले आहेत. तेथेच त्यांचा पाडाव्याच्या ठिकाणी गुजरात प्रशासन व सेवाभावी संस्थांतर्फे त्यांना सुविधा पुरविल्या जात होत्या. मात्र लॉकडाऊन वाढल्याने सुविधांचा वाणवा सुरू झाला. मजुरांना तेथे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्याबाबतचे व्हीडीओ हे मजूर सोशल मिडियाद्वारे सातत्याने या भागातील कार्यकर्त्यांना पाठवत होते. त्यावर महाराष्टÑ शासनाने देखील गंभीरपणे विचार सुरू केला होता. गुजरातच्या सरकारने या मजुरांना महाराष्टÑाने घेऊन जावे, असा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. पण महाराष्टÑात आणल्यानंतर या मजुरांना क्वारंटाईन कसे करावे, इतक्या मजुरांची सुविधा कशी करावी असे अनेक प्रश्न प्रशासनाला सतावत होते. या प्रश्नांवर तोडगा निघण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी अचानक गुजरातमधून मजूर भरुन आलेले अनेक वाहने महाराष्टÑाच्या सीमेवर दाखल झाले. ही माहिती प्रशासनाला मिळताच पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी तेथे दाखल होऊन त्यांना महाराष्टÑात येण्यास मज्जाव केला. यासंदर्भात काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. काही अधिकाऱ्यांनी या मजुरांनी गुजरातमध्ये पुन्हा परत जावे यासाठी देखील प्रयत्न केला. पण गुजरात प्रशासनाने मात्र त्यास नकार दिला. हा विषय थेट पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्यापर्यंत गेला. हे सर्व परतलेले मजूर त्यांच्याच मतदारसंघातील असल्याने त्यांनी तोडगा काढावा, अशी गळ कार्यकर्त्यांनी त्यांना घातली. अखेर चर्चेनंतर या मजुरांना महाराष्टÑाच्या सीमेत येऊ देण्याचा निर्णय झाला. या सर्व मजुरांची प्राथमिक आरोग्य तपासणी करावी व त्यांना त्यांच्या गावी जाऊ देण्याबाबत निर्णय झाला. त्या मजुरांना त्यांच्या घरात क्वारंटाईन करण्यात येणार आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.दरम्यान दुपारच्या रखरखत्या उन्हात सहा महिने ते पाच वर्षांची लहान लेकरे घेत माता तपासणीसाठी जात होत्या़ घरी जाण्याच्या ओढीने त्या ऊनही सहन करत होत्या़दरम्यान, सकाळी सातपासून आलेल्या मजुरांना सावळदा, ता.नंदुरबार या गावाच्या पुढे गुजरातमध्ये थांबवून ठेवण्यात आले होते. चार तासाच्या चर्चेनंतर त्यांची वाहने आमलाड, ता.तळोदा येथे सुमारे ३० किलोमीटर माघारी पाठविण्यात आले. तेथे त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दुपारी चारच्या सुमारास ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांची वाहने गावाकडे रवाना करण्यात आली. सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत मात्र रखरखत्या उन्हात मजुरांचे प्रचंड हाल झाले. लहान बाळ असलेल्या महिलांचे अधिकच हाल झाले.