‘वन पोल वन डिपी’ला कोरोनामुळे लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:02 PM2020-05-25T12:02:45+5:302020-05-25T12:02:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : वीज वितरण कंपनीने गेल्या वर्षापासून सुरु केलेल्या वन पोल वन डिपी योजनेला कोरोनाने ब्रेक ...

‘One Pole One DP’ took a break due to corona | ‘वन पोल वन डिपी’ला कोरोनामुळे लागला ब्रेक

‘वन पोल वन डिपी’ला कोरोनामुळे लागला ब्रेक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : वीज वितरण कंपनीने गेल्या वर्षापासून सुरु केलेल्या वन पोल वन डिपी योजनेला कोरोनाने ब्रेक लावला आहे़ यातून १ हजार २०० प्रस्तावित लाभार्थीं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून खरीपापूर्वी त्यांना या डीपीचे वाटप करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे़
शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव या चार तालुक्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागाकडून १ हजार २०० शेतकऱ्यांना वन पोल वन डिपीचा पहिल्या टप्प्यात लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते़ नियमित वीज बिलांचा भरणा करुन कंपनीला सहकार्य करणाºया अर्जदार शेतकºयांना प्रथम प्राधान्य देण्याचे यातून निश्चित करण्यात आले होते़ २०१९-२० या वर्षात चार तालुक्यात एक हजार २०० शेतकºयांना कनेक्शन मिळणे निश्चित होते़ परंतू कालांतराने सुरु असलेल्या अडचणींमुळे योजना बारगळत होती़ यातच देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊनची घोषणा झाली़ परिणामी वन पोल वन डिपी हा उपक्रमही थांबवण्यात आला आहे़ वीज कंपनीने ही योजना सुरु करण्यापूर्वी २०२० मध्ये लाभार्थी शेतकºयांच्या शेतात डीपी देण्याचे निर्धारित केले होते़ यानुसार अर्ज मागणी करुन डिमांड भरुन घेण्यात आली आहे़ शहादा विभागातील कोटा वाढवण्याबाबत शेतकºयांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यावर चर्चाही सुरु होती़ मात्र कोरोनामुळे ह्या सर्व चर्चा थांबल्या आहेत़ येत्या खरीप हंगामात शेतकºयांना पुन्हा जुन्या पद्धतीने पिकांचे संगोपन करण्याची वेळ येणार आहे़ बºयाच वेळा पाऊस लांबल्यास खरीप हंगामासाठी कृषीपंप हे सहाय्यकारी ठरुन पिकांना वाचवले जाते़ परंतू वीज कंपनीच्या ट्रान्सफामर्सचा पावसाळ्यात बोजवारा उडत असल्याचा प्रकार घडतो़ यामुळे या योजनेला पसंती होती़ शासनाने वीज कंपनीला आदेशित करुन योजना नव्याने सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे़ तळोदा आणि शहादा या दोन तालुक्यांसह दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यातील बागायतदार शेतकºयांना या स्वतंत्र डिपी कृषी क्षेत्रात प्रगतीची दारे खुलणार आहेत़
जिल्ह्याच्या विविध भागात हा उपक्रम सुरु करण्याची मागणी आहे़ नंदुरबार, नवापुर या तालुक्यातही योजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकºयांना डीपीचे वाटप करुन खरीप हंंगामात दिलासा देण्यात यावा अशी अपेक्षा करण्यात येत आहे़

एकीकडे कोरोनामुळे वन पोल हा उपक्रम बंद करण्यात आला असताना दुसरीकडे कंपनीने दोन वर्षांपासून नवीन कृषीपंपांचे कनेक्शन देणे बंद केले आहे़ यातून अर्ज केलेल्या शेतकºयांना दिलासा मिळालेला नाही़ कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही़ नवीन कनेक्शनसाठी शेतकरी डिमांड भरण्यासही तयार आहेत़
शहादा विभागातील चार तालुक्यात तब्बल २७ हजार कृषीपंप कनेक्शन आहेत़ यातील बºयाच शेतकºयांचे मागील थकीत रक्कम हा गंभीर प्रश्न आहे़ कंपनीकडून सरसकट रिडिंगची मोजणी करुन बिले पाठवली गेली असल्याने शेतकºयांच्या नावांसमोर थकबाकी दिसत आहे़ कंपनीने योग्य पद्धतीने बिले काढावीत किंवा सरसकट बिले माफ करण्यात यावी अशी शेतकºयांची मागणी आहे़ चार तालुक्यात आतापर्यंतची वीज बिलांची थकबाकी ही तब्बल ४१७ कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे़
वीज कंपनीकडून बºयाच शेतकºयांना वन पोल ऐवजी सोलरपंप योजनेत समाविष्ट होण्याबाबत विचारणा केली जाते़ परंतू जमिनीत खोलवर गेलेले पाणी सोलरमुळे बाहेर येण्यास अडचणी येतील असे शेतकºयांचे म्हणणे आहे़ यामुळे वन पोल यांतर्गत नवीन कोटा वाढवून शेतकºयांना लाभ देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे़
४शहादा विभागात आतापर्यंत ७०० जणांना वन पोल वन डिपीचा लाभ दिल्याचे वीज कंपनीकडून सांगण्यात आले आहे़

चार तालुक्यांमध्ये वन पोल वन डिपींतर्गत कनेक्शन देण्याचे काम लवकरच वेगाने सुरु होईल़ कोरोनामुळे कामकाजाला मर्यादा आल्या आहेत़ त्यावर मात करुन लवकरच शेतकºयांसाठी उपक्रम सुरु करणार असून तशी माहिती दिली जाईल़
-किसन पवार, कार्यकारी अभियंता, शहादा

Web Title: ‘One Pole One DP’ took a break due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.