लाकडे जाळल्याच्या वादातून जमावाची एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:42 IST2020-06-14T12:41:56+5:302020-06-14T12:42:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जंगलातील लाकडे जाळल्याच्या वादातून एकास सहा जणांनी एकास बेदम मारहाण केली. महिलेचा विनयभंग केल्याची ...

One of the mob was beaten up over a dispute over wood burning | लाकडे जाळल्याच्या वादातून जमावाची एकास मारहाण

लाकडे जाळल्याच्या वादातून जमावाची एकास मारहाण


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जंगलातील लाकडे जाळल्याच्या वादातून एकास सहा जणांनी एकास बेदम मारहाण केली. महिलेचा विनयभंग केल्याची घटना मोकस, ता.अक्कलकुवा येथे घडली.
केवडीचा घोडापाडा येथील महिला तिच्या पतीने जंगलातील लाकडे तोडल्याचा संशय घेत जमावाने ही मारहाण केली. महिला ११ रोजी पतीसह दुचाकीने गावाकडे जात असतांना रस्त्यावर त्यांना अडवून पतीला जबर मारहाण करण्यात आली तर महिलेचा विनयभंग करण्यात आला.
महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संजय खाल्या वसावे, खाल्या राण्या वसावे, अतुल खाल्या वसावे, मिथून वसावे, मंगलसिंग खाल्या वसावे, देवजी राण्या वसावे सर्व रा.केवडीचा घोडापाडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास फौजदार राजेश पाटील करीत आहे.

Web Title: One of the mob was beaten up over a dispute over wood burning