नंदुरबार जिल्ह्यात गणवेशाचा एक लाख विद्याथ्र्याना लाभ

By Admin | Updated: May 23, 2017 17:22 IST2017-05-23T17:22:36+5:302017-05-23T17:22:36+5:30

सर्व शिक्षा अभियान : यंदा पहिल्यांदाच विद्याथ्र्याच्या बँक खात्यावर पैसे मिळणार

One lakh students of uniforms in Nandurbar district benefit from this | नंदुरबार जिल्ह्यात गणवेशाचा एक लाख विद्याथ्र्याना लाभ

नंदुरबार जिल्ह्यात गणवेशाचा एक लाख विद्याथ्र्याना लाभ

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.23- सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वाटण्यात येत असलेल्या गणवेशाचा लाभ यंदा एक लाख एक हजार 619 विद्याथ्र्याना  मिळणार असून या वर्षापासून प्रथमच विद्याथ्र्याच्या बँक खात्यावर गणवेशाची रक्कम टाकण्यात येणार आह़े
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक  शिक्षण विभागातील तसेच नगरपालिका शाळेतील पहिली ते आठवीच्या  वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दारिद्रय रेषेखालील  विद्याथ्र्याना शासनाकडून दरवर्षी मोफत दोन गणवेश देण्यात  येत असतात़ दारिद्रय रेषेखालील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना मोफत                पुस्तके तसेच गणवेशाचे वाटप करण्यात येत असत़े त्यासाठी यंदा एक लाख एक हजार 619 विद्याथ्र्याना त्याचा लाभ मिळणार आह़े यात, 49 हजार 24 मुले तर तब्बल 52 हजार 595 मुलींचा समावेश असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अरुण पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आह़े 

Web Title: One lakh students of uniforms in Nandurbar district benefit from this