प्रकाशा येथील विलगीकर कक्षाची अधिकाऱ्यांकडून पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST2021-04-21T04:30:30+5:302021-04-21T04:30:30+5:30

प्रकाशा- येथे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी शिक्षण विभागातील अधिकारी, पदाधिकारी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांच्या ड्युटी ...

Officers inspect the detachment cell at Prakasha | प्रकाशा येथील विलगीकर कक्षाची अधिकाऱ्यांकडून पहाणी

प्रकाशा येथील विलगीकर कक्षाची अधिकाऱ्यांकडून पहाणी

प्रकाशा- येथे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी शिक्षण विभागातील अधिकारी, पदाधिकारी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांच्या ड्युटी लावण्यात आल्या आहेत. येथे तीन दिवसात अधिकारी व पदाधिकारी यांनी भेट देऊन पहाणी केली.

प्रकाशा ग्रामपंचायत,महसूल विभाग अंतर्गत सद्गुरू धर्मशाळा येथे कोविड - १९ विलगीकरण कक्ष आहे.या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर यांनी भेट देऊन योग्य त्या सूचना दिल्यात. कोविड विलगीकरण कक्ष येथे देखरेखीसाठी मुख्याध्यापक यांची नेमणूक करण्यात आली आहे. पेंढारकर यांनी भेट दिली, तेथील नियोजन विषयी माहिती जाणून घेत तेथील भौतिक सुविधा , जेवणाची सुविधा याची प्रत्यक्ष पाहणी करत सूचना केल्यात .

यावेळी सोबत प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख आर.एम .धनगर, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक रामलाल पारधी, कन्या शाळेचे मुख्या. रवींद्र पाटील,उर्दू शाळेचे मुख्या. जावेद, रामनगर शाळेचे महेंद्र शिंपी, महिरे, प्रकाशा ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी बी. जी. पाटील, तलाठी धर्मराज चौधरी, सद्गुरु धर्म शाळेचे चेअरमन मोहन चौधरी, उपस्थित होते.

माध्यमिक शिक्षण अधिकारी मच्छिंद्र कदम यांनी देखील या ठिकाणी भेट देत योग्य त्या सूचना संबंधितांना दिल्या.

Web Title: Officers inspect the detachment cell at Prakasha