शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील बसस्थानकालगत डोंगरगाव रोड, दोंडाईचा रोड, खेतिया रोड परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणाºया टपऱ्यांसह पक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील बसस्थानकालगत डोंगरगाव रोड, दोंडाईचा रोड, खेतिया रोड परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणाºया टपऱ्यांसह पक्के व इतर अतिक्रमण पालिकेतर्फे काढण्यात आले. मात्र त्याठिकाणी आता अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांंनी ताबा घेतल्याने पालिकेने या अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांसाठी जागा मोकळी केली का? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.पालिकेतर्फे शहरात अतिक्रमण मोहीम सुरू असून बसस्थानकालगत, डोंगरगाव रोड व दोंडाईचा रोड आदी परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे या परिसरातील अतिक्रमणधारकांनी कारवाई होण्याआधीच स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. तर काही अतिक्रमणावर बुलडोझर चालविण्यात आला. अतिक्रमण काढल्यामुळे डोंगरगाव रस्ता व बसस्थानक चौकाने मोकळा श्वास घेतला होता. मात्र या जागेवर सध्या अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांनी अतिक्रमण करीत वाहनांच्या रांगा लागत आहेत. या रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने बºयाचवेळा वाहतुकीची कोंडी होते. बसस्थानक ते पटेल रेसिडेन्सी चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ही वाहने लावलेली असतात. हा रस्ता नवीन वसाहतींना जोडणारा मुख्य रस्ता असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ असते. आधीच अरुंद व त्यातच रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने बºयाचवेळा अपघात होतात.या अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनधारकांना खाकीचा धाक नसल्याचे जाणवते. वाटेल त्याठिकाणी रस्त्यावर वाहने उभी केली जातात. काही वाहतूक पोलीस तर अटकाव करण्याचे सोडून त्या वाहनचालकांजवळ गप्पा करत उभे असतात. काही महिन्यापूर्वी शहराच्या वाहतुकीच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यान्वित करण्यात आला. मात्र विभाग थोड्याच दिवसात हा विभाग बंद पडल्याचे समजते. पालिका प्रशासनाने रस्त्यावरील लॉरी, टपºया, हातगाड्यांवर कारवाई करून रस्ते मोकळे केले. तर मुख्य रस्त्यांवर कोणताच धाक न बाळगता वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनांवर पोलीस प्रशासन कारवाई का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अतिक्रमण काढून मोकळ्या झालेल्या जागेवर पालिका व पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना करून वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटविण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.