तळोदा पालिकेत विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:16 PM2020-01-15T13:16:22+5:302020-01-15T13:17:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा पालिकेच्या विविध विषय समित्यांची निवडणूक मंगळवारी पालिका सभागृहात घेण्यात आली. याप्रसंगी सर्व समित्या ...

Non-election of subject committees | तळोदा पालिकेत विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध

तळोदा पालिकेत विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तळोदा पालिकेच्या विविध विषय समित्यांची निवडणूक मंगळवारी पालिका सभागृहात घेण्यात आली. याप्रसंगी सर्व समित्या बिनविरोध घोषित करण्यात आल्या.
पालिकेच्या विषय समितीत्यांचा कालावधी एक वर्षांचा असतो. त्यामुळे मावळत्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन विषय समित्यांची निवडणूक पालिकेच्या सभागृहात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार पंकज लोखंडे होते. या वेळी मुख्याधिकारी सपना वसावे, कार्यालयीन अधीक्षक विजय सोनवणे, अश्विन परदेशी उपस्थित होते. सर्वच समित्यांच्या सदस्यांसाठी केवळ एक-एकच अर्ज दाखल झाल्यामुळे बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
या वेळी बांधकाम समिती सभापती रामानंद शिरीषकुमार ठाकरे, सदस्य शोभाबाई जालंदर भोई, हेमलाल मगरे, अनिता संदीप परदेशी, हितेंद्र क्षत्रिय, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती योगेश प्रल्हाद पाडवी, सदस्य सुरेश महादू पाडवी, सविता नितीनपाडवी, संजय बबनराव माळी, सुभाष धोंडू चौधरी, पाणीपुरवठा समिती सभापती अमनोद्दीन फकरोद्दीन शेख, सदस्य भास्कर दत्तू मराठे, सयना अनुपकुमार उदासी, सुभाष धोंडू चौधरी, गौरव देवेंद्रलाल चौधरी, महिला व बालकल्याण समिती सभापती अंबिका राहूल शेंडे, सदस्य बेबीबाई हिरालाल पाडवी, सयना अनुपकुमार उदासी, अनिता संदीप परदेशी, कल्पना सतीवान पाडवी, नियोजन व विकास समिती सभापती भाग्यश्री योगेश चौधरी, हेमलाल पुरूषोत्तम मगरे, भास्कर मराठे, संजय माळी, गौरव वाणी, स्थायी समिती अध्यक्ष अजय परदेशी, सदस्य भाग्यश्री चौधरी, अंबिका राहुल शेंडे, रामानंद ठाकरे, अमानुद्दीन शेख, योगेश पाडवी आहेत. या विषय समित्यांच्या बिनविरोध निवडीसाठी नगराध्यक्ष अजय परदेशी, योगेश चौधरी, अनुपकुमार उदासी, जालंधर भोईल, राहूल शेंडे, राजू पाडवी, नितीन पाडवी, हिरालाल पाडवी, हेमलाल मगरे, भास्कर मराठे यांनी परिश्रम घेतले. या वेळी कार्यकर्त्यांनी स्मारक चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला होता. सभापती निवडी दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तळोदा पालिकेत आता पावेतो विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड बिनविरोध पार पाडली जात होती. या वेळीही सत्ताधारी पक्षांनी निवड बिनविरोध घडवून आणली आहे. १८ सदस्यीय पालिकेत सत्ताधारी भाजपाचे ११, विरोधी काँग्रेसचे सहा, शिवसेना एक असे बलाबल आहे. समित्यांमध्ये सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनादेखील समाविष्ट करुन समतोल साधला आहे.

Web Title: Non-election of subject committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.